भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती?

| Updated on: May 05, 2020 | 11:56 AM

भवानी पेठेत तब्बल 416 रुग्ण आहेत. ढोले पाटील रोडला 314, शिवाजीनगर-घोले रोडला एकूण 242, तर येरवडा कळस धानोरी 214 भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Pune Wards Corona Patients Updates)

भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती?
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी 71 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 2 हजार 122 वर गेली आहे. पुण्यात 24 तासात 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत 115 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 878 रुग्ण असून आतापर्यंत 107 ‘कोरोना’ग्रस्त दगावले आहेत. (Pune Wards Corona Patients Updates)

पुण्यात भवानी पेठेतील रुग्णसंख्येने चारशेचा टप्पा ओलांडला आहे. ढोले पाटील रोडवरील रुग्णांचा आकडा तीनशेच्या वर, तर शिवाजीनगर-घोलेरोड आणि येरवडा-धानोरी भागातील रुग्ण प्रत्येकी दोनशेच्या पार गेले आहेत.

पुणे शहरात 4 मेपर्यंत 1890 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

हेही वाचा : गाडीवरुन नाही, पायी जा, दारु खरेदीसाठी पुणे पोलिसांचे 6 नियम

भवानी पेठेत तब्बल 416 रुग्ण आहेत. ढोले पाटील रोडला 314, शिवाजीनगर-घोले रोडला एकूण 242, तर येरवडा कळस धानोरी 214 भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सर्वात कमी रुग्ण असलेल्या कोथरुड बावधनमध्ये काल एक नवा रुग्ण सापडल्याने आकडा पाचवर गेला आहे.

भवानी पेठ (25 नवे रुग्ण), ढोले पाटील रोड (24), येरवडा- धानोरी (20), कसबा-विश्रामबाग वाडा (11) या भागात कालच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 4 (0)
कोथरुड – बावधन –  5(+1)
वारजे – कर्वेनगर – 10 (+1)
सिंहगड रोड –  16 (+4)
शिवाजीनगर – घोलेरोड – 242 (+2)
कसबा – विश्रामबाग वाडा – 169 (+11)
धनकवडी – सहकारनगर – 124 (+3)
भवानी पेठ – 416 (+25)
(Pune Wards Corona Patients Updates)
बिबवेवाडी – 71 (+3)
ढोले पाटील रोड –  314 (+24)
कोंढवा – येवलेवाडी – 30 (+1)
येरवडा – धानोरी – 214 (+20)
नगर रोड – वडगाव शेरी – 55 (+6)
वानवडी – रामटेकडी – 96 (+1)
हडपसर – मुंढवा –  56 (+1)
पुण्याबाहेरील – 68 (+1)