धक्कादायक! क्वारंटाईनसाठी दिलेल्या शिक्क्यांची शाई निकृष्ट, पाण्याने धुवून लोक घराबाहेर

| Updated on: Apr 19, 2020 | 11:35 PM

जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Quarantine stamp duplicate) आहे.

धक्कादायक! क्वारंटाईनसाठी दिलेल्या शिक्क्यांची शाई निकृष्ट, पाण्याने धुवून लोक घराबाहेर
Follow us on

पुणे : जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Quarantine stamp duplicate) आहे. यादरम्यान देशात अनेक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात संशयित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांना क्वारंटाईन केले जात आहे. क्वारंटाईन केलेल्या संशयितांच्या हातावर शिक्के मारले जातात. पण धक्कादायक म्हणजे हे शिक्के पाण्याने धुतले जात असल्याचे भोरच्या नेरे सरकारी रुग्णालयात समोर आले (Quarantine stamp duplicate) आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयितांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. यासाठी वापरली जाणारी शाई ही निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेक जण हातावरचा शिक्का पाण्याने धुवून घराबाहेर पडत आहेत. ज्या लोकांना शिक्का मारलेला आहे त्यांनीच शिक्का धुता येत असल्याचे सांगितले आहे.

या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली आहे. तर वैद्यकीय अधिकारी यांनी शाई बदलून पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नुकतेच काही क्वारंटाईन करण्यात आलेले काही लोक घराबाहेर फिरत होते. तर काही जण प्रवास करताना आढळले होते. क्वारंटाईनमध्येही फिरत असलेल्या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. तसेच या लोकांच्या हातावरील स्टॅम्प पाहून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 3 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 201 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 331 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.