#Metoo against Anurag Kashyap | #Metooच्या आरोपानंतर राधिका, तापसीचा अनुराग कश्यपला पाठिंबा

| Updated on: Sep 21, 2020 | 2:13 PM

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर #Metoo मोहिमेअंतर्गत केलेल्या आरोपांनंतर विविध स्थरांवरुन दिग्दर्शक अनुराग कश्यप याला पाठिंबा दिला जात आहे.

#Metoo against Anurag Kashyap | #Metooच्या आरोपानंतर राधिका, तापसीचा अनुराग कश्यपला पाठिंबा
Follow us on

मुंबई : अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर #Metoo मोहिमेअंतर्गत केलेल्या आरोपांनंतर विविध स्तरांवरुन दिग्दर्शक अनुराग कश्यप याला पाठिंबा दिला जात आहे. अभिनेत्री तापसी पन्नूनंतर आता अभिनेत्री राधिका आपटे हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत अनुराग कश्यपला पाठिंबा दर्शवला आहे. राधिकाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आपल्याला नेहमीच अनुरागसोबत सुरक्षित वाटत असल्याचे म्हणाली आहे.(Radhika Apte Supports Anurag Kashyap)

“अनुराग तू माझा खूप चांगला मित्र आहेस तू मला नेहमीच प्रेरित करतोस आणि तू नेहमी माझ्यासोबत उभा राहीला आहेस. आपले एकमेकांविषयीचे प्रेम आणि आदर खूप वेगळा आहे. तू नेहमीच माझा चांगला मित्र होतास आणि राहशील, खूप प्रेम ” असे कॅप्शन देत राधिका आपटेने ही पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अनुराग कश्यपचे समर्थन केले आहे. “अनुराग तू माझ्या सर्व मित्र मैत्रिणींमध्ये सगळ्यात मोठा स्त्रीवादी माणूस आहेस, लवकरच तुझ्या नवीन सेटवर आपली भेट होईल. ज्यात जगातील महिला किती शक्तिशाली आणि लक्षणीय हे दिसेल ” (Radhika Apte Supports Anurag Kashyap)

अभिनेत्री पायल घोषने शनिवारी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. पायल घोषने ट्विट करत दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा दावा केला होता. सोबतच “अनुराग कश्यपवर कारवाई करा आणि या सर्जनशील व्यक्तीची राक्षसी वृत्ती सगळ्यांसमोर येऊ द्या ” अशी मागणी देखील केली .

सोबतच रविवारी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीसुद्धा अनुराग कश्यपला पाठिंबा देत ट्विट केले . त्यांनी #Metoo या मोहिमेचा चुकीचा उपयोग केला जात असल्याचे म्हटले आहे. “#Metoo ही एक महत्वाची मोहीम आहे, या मोहिमेची पावित्र्य जपणे महिला आणि पुरुष या दोघांचे कर्तव्य आहे. या मोहिमेचा दुरुपयोग करु नये” असेही ते म्हणाले .

(Radhika Apte Supports Anurag Kashyap)

 

संबंधित बातम्या 

मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली : अनुराग कश्यप

आता सहन होत नाही, मी बोलणारच, कंगनाची वागणूक तिच्या घरच्यांनाही दिसत नाही? : अनुराग कश्यप