VIDEO : अखेर ‘राफेल’ भारतीय अवकाशात झेपावलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

बंगळुरु : गेल्या काही महिन्यांपासून देशपातळीवर राफेल कराराचा मुद्दा गाजत आहे. राफेल विमान कसा आहे, याबाबतही अनेकांना उत्सुकता आहे. याचदरम्यान बंगळुरुत सुरु असलेल्या 12 व्या ‘एरो इंडिया 2019’ कार्यक्रमात भारतीय अवकाशात फ्रान्स बनावटीच्या राफेलने उड्डाण घेतलं आणि उपस्थितांनी मोठ्या कुतुहलाने या उड्डाणाकडे पाहिले. राफेलबाबत एव्हाना अवघ्या भारताला कळलं आहे. मात्र, प्रत्यक्षात राफेल कसं दिसतं, ते […]

VIDEO : अखेर राफेल भारतीय अवकाशात झेपावलं!
Follow us on

बंगळुरु : गेल्या काही महिन्यांपासून देशपातळीवर राफेल कराराचा मुद्दा गाजत आहे. राफेल विमान कसा आहे, याबाबतही अनेकांना उत्सुकता आहे. याचदरम्यान बंगळुरुत सुरु असलेल्या 12 व्या ‘एरो इंडिया 2019’ कार्यक्रमात भारतीय अवकाशात फ्रान्स बनावटीच्या राफेलने उड्डाण घेतलं आणि उपस्थितांनी मोठ्या कुतुहलाने या उड्डाणाकडे पाहिले. राफेलबाबत एव्हाना अवघ्या भारताला कळलं आहे. मात्र, प्रत्यक्षात राफेल कसं दिसतं, ते किती वेगाने उडतं, हे कुणी पाहिले नव्हते. ते बंगळुरुतील ‘एरो इंडिया 2019’ मध्ये पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

बंगळुरुमध्ये 12 व्या ‘एरो इंडिया 2019’ चं आयोजन करण्यात आलं आहे. 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरुतील येलहंका येथे एअर शो सुरु आहेत. जगभरातील 100 हून अधिक कंपन्यांनी या एअर शोमध्ये भाग घेतला असून, त्यामध्ये अमेरिकेतील बाईंग, फ्रान्समधील राफेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांचाही सहभाग आहे.

बंगळुरुतील या एरो इंडिया शोदरम्यान राफेलने कमी वेगाने उड्डाण घेतले. याचे कारण या राफेल विमानाने विंग कमांडर साहील गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. साहील गांधी यांचा काल सूर्या किरण एरोबॅटिक्स टीमच्या शो दरम्यान अपघाती मृत्यू झाला.

फ्रान्स एअरफोर्सचे एकूण दोन राफेल फायटर प्लेन बंगळुरुत एरो इंडिया शोसाठी भारतात आणले आहेत. या शोमध्ये एकूण तीन राफेल विमानांनी सहभाग घेतला असून, भारतीय वायूसेनेचे टॉप ऑफिसर, ज्यात डेप्युटी चीफ एअर मार्शल विवेक चौधरी हेही समाविष्ट असतील, ते या राफेल विमानाचे सारथ्य करतील.

भारतीय ‘तेजस’ आकर्षणाचं केंद्र

पाच दिवस चालणाऱ्या या एअर शोदरम्यान संरक्षण उद्योग आणि एअरोस्पेससाठी महत्वाच्या व्यापार प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या एअर शोमध्ये सर्वात आकर्षणाचं केंद्र असेल ते, भारतीय बनावटीचं मल्टीरोल एअरक्राफ्ट ‘तेजस विमान’.

भारतीय बनावटीचं कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) बंगळुरुतील या एरो इंडियामध्ये खास आकर्षण ठरलं आहे. या एअरक्राफ्टचं नामकरण ‘तेजस’ असे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनीच केले होते. पहिल्याच दिवशी यशस्वी आणि शानदार उड्डाण घेतल्यानंतर ‘तेजस’ने एकप्रकारे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजलीच अर्पण केली.