Raj Kapoor | राज कपूर यांच्या अलिशान हवेली विक्री नाही!

| Updated on: Jan 28, 2021 | 11:13 AM

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांची वडिलोपार्जित हवेली खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

Raj Kapoor | राज कपूर यांच्या अलिशान हवेली विक्री नाही!
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांची वडिलोपार्जित हवेली खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आता हवेलीच्या मालकाने सरकारकडून ठरवून दिलेल्या किंमतीत हवेली विकण्यास नकार दिला आहे. हवेलीच्या मालकाचे म्हणणे आहे की, हवेली खूप चांगल्या ठिकाणी आहे सरकारकडून जी रक्कम ठरून देण्यात आली आहे ती अत्यंत कमी आहे. (Raj Kapoor’s mansion in Pakistan will not be sold)

सरकार या हवेलीचे रुपांतर एका संग्रहालयाच्या इमारतीत करुन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे. राज कपूर यांच्या या हवेलीचे सध्या मालक हाजी अली साबिर आहेत. बुधवारी एका खासगी वाहिनीशी झालेल्या चर्चेत त्यांनी दीड कोटी रुपयांना हवेली विक्री करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे घर 51.75 चौरस मीटर आहे त्याची किंमत 1.50 कोटी ठरवली आहे. जी अत्यंत कमी आहे. यामुळे या किंमतीमध्ये हवेली विकणे शक्य नाही. ही हवेली पेशावर शहराच्या मधोमध आहे.

1918 आणि 1922 दरम्यान ही हवेली बांधले गेले होती. राज कपूरचं वडिलोपार्जित हवेली कपूर हवेली नावाने ओळखलं जातं. ही हवेली किस्सा ख्वानी बाजारात आहे. ही हवेली राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली होती. राज कपूर आणि त्यांचे चुलते त्रिलोक कपूर यांचा याच हवेलीत जन्म झाला आहे.

ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये  झाला होता. त्यांचे खरे नाव ऋषीराज कपूर. ऋषी कपूर हे द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे नातू. मुंबईतील चॅम्पियन स्कूलमध्ये ऋषी कपूर यांचं शिक्षण झालं. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते कपूर कुटुंबासह चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते.

संबंधित बातम्या : 

Radhe vs SMJ 2 | सलमान विरुद्ध जॉन अब्राहम ‘सामना, कोण मारणार बाजी?

MeToo | प्रिती झिंटाच्या 2 वर्षांपूर्वीच्या विधानाची सोना महापात्राकडून जोरदार खिल्ली!

‘गुम हैं किसी के प्यार में’ मालिकेतील नील ऐश्वर्याचं जमलं!, रोका सेरेमनीचे खास फोटो शेअर

(Raj Kapoor’s mansion in Pakistan will not be sold)