दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे (Heritage status to ancestral homes of Dilip Kumar and Raj Kapoor).

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरांना पाकिस्तान सरकारकडून ऐतिहासिक इमारतीचा दर्जा
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 11:31 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे (Heritage status to ancestral homes of Dilip Kumar and Raj Kapoor). हे घर खरेदी केल्यानंतर त्याचं रुपांतर ऐतिहासिक इमारतीत करुन त्याचं जतन आणि संवर्धन केलं जाणार आहे. या घराची सध्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. पडझड झालेलं हे घर कोसळण्याचाही धोका आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या पुरातत्व विभागाने या दोन्ही इमारती खरेदी करण्यासाठी आवश्यक निधीची देखील सोय केली आहे. या इमारतींना राष्ट्रीय ठेवा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. हे घर पेशावर शहराच्या मधोमध आहे. पुरातत्व विभागाचे डॉ. अब्दुस समद खान म्हणाले, “दोन्ही ऐतिहासिक इमारतींसाठीची गुंतवणूक निश्चित करण्यासाठी पेशावरच्या उपायुक्तांना एक अधिकृत पत्र पाठवण्यात आलंय. या दोन्ही ठिकाणी भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज महानायक फाळणीपूर्वी जन्माला आले. त्यांच्या बालपणातील सुरुवातीचे दिवस येथेच गेले.

1918 आणि 1922 मध्ये घराचं बांधकाम

राज कपूरचं वडिलोपार्जित घर कपूर हवेली नावाने ओळखलं जातं. हे घर किस्सा ख्वानी बाजारात आहे. हे घर राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधलं होतं. राज कपूर आणि त्यांचे चुलते त्रिलोक कपूर यांचा याच घरात जन्म झाला. आता पाकिस्तानमधील प्रांत सरकारकडून या इमारतींना राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित करण्यात आलंय.

अभिनेता दिलीप कुमार यांचं 100 वर्षांपूर्वीचं वडिलोपार्जित घरही याच भागात आहे. त्या घराची बरीच पडझड झाली आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नवाज शरीफ यांच्या सरकारने दिलीप कुमार यांच्या घराला राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित केलं होतं.

कपूर हवेलीसाठी 200 कोटींची मागणी

समद खान म्हणाले, “दोन्ही इमारतींना पाडून तेथे व्यावसायिक संकुल उभं करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, अशा प्रयत्नांना विरोध करण्यात आला. पुरातत्व विभागाने इमारतींचं ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्यांचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. कपूर हवेलीच्या मालकाचं म्हणणं आहे, “ही इमारत पाडायची नाही. त्यामुळेच पुरातत्व विभागाशी संपर्क साधून या इमारतींचं जतन करण्याची मागणी केली आहे.” या इमारतीच्या मालकाने खैबर पख्तूनख्वा सरकारकडे 200 कोटींची मागणी केली आहे.

हेही वाचा :

भारत-पाकिस्तान सीमेवर शेतीचे अनोखे प्रयोग, शेतकऱ्यांच्या दिमतीला सैन्याकडून बुलेटफ्रूफ ट्रॅक्टर

आधी मुख्यमंत्र्यांना दुबईतून धमकी, आता ATS ची रायगडमध्ये मोठी कारवाई, तिघे ताब्यात

Kangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

Heritage status to ancestral homes of Dilip Kumar and Raj Kapoor

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.