VIDEO: राखी सावंतच्या प्रियकराला भररस्त्यात चोपलं

नवी दिल्ली: अभिनेत्री राखी सावंतचा कथित प्रियकर दीपक कलाल याला दिल्लीत भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीत रात्रीच्या वेळेस कारशेजारी उभा असलेल्या दीपकला एका अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मारहाण करणाऱ्या व्यक्तीने दीपकला आतापर्यंत पोस्ट केलेल्या सर्व व्हिडिओसाठी माफी मागण्यास भाग पाडले. तसेच भविष्यात पुन्हा असे कोणतेच आक्षेपार्ह व्हिडीओ […]

VIDEO: राखी सावंतच्या प्रियकराला भररस्त्यात चोपलं
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नवी दिल्ली: अभिनेत्री राखी सावंतचा कथित प्रियकर दीपक कलाल याला दिल्लीत भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीत रात्रीच्या वेळेस कारशेजारी उभा असलेल्या दीपकला एका अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मारहाण करणाऱ्या व्यक्तीने दीपकला आतापर्यंत पोस्ट केलेल्या सर्व व्हिडिओसाठी माफी मागण्यास भाग पाडले. तसेच भविष्यात पुन्हा असे कोणतेच आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची धमकीसुद्धा त्याने दिली.

स्वत: दीपकनेच त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यामुळे दीपकचा हा अजून एक पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका त्याच्यावर होत आहे.

दरम्यान, या मारहाणीनंतर राखी सावंतची आगपाखड झाली आहे. राखीने तिची नाराजी जाहीर केली. राखी म्हणते, मला मान्य आहे की दीपक कलालने चूक केली आहे, मात्र अशाप्रकारे त्याला मारहाण करणं चुकीचं आहे. जर दीपकचं म्हणणं चुकीचं असेल तर पोलिसात तक्रार करायला हवी होती, असं राखी म्हणाली.

राखी सावंत सध्या दीपक कलालसोबत यूट्यूबवर बरेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपक कलाल आणि राखी सावंतने पत्रकार परिषद घेत लग्नाची घोषणा केली होती. त्यावेळी दीपकने नव्हे तर राखीने दीकपच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं.

दीपक कलालने दिल्लीतील ‘कनॉट प्लेस’ परिसरात एका झाडावर लघुशंका करत असलेला व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवरुन अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती.