AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या दोन नेत्यांचा पक्ष प्रवेश होऊच देणार नाही, भाजप कार्यकर्ते इरेला पेटले, भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ

Nashik Corporation Election 2026 : नाशिक भाजप कार्यालयाबाहेर एक हाय वोलेटेज ड्रामा पहायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही अशी भूमिका देवयानी फरांदे यांनी घेतली आहे.

ठाकरेंच्या दोन नेत्यांचा पक्ष प्रवेश होऊच देणार नाही, भाजप कार्यकर्ते इरेला पेटले, भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ
Nashik Corporation Election 2026
| Updated on: Dec 25, 2025 | 1:02 PM
Share

नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अनेक वर्षांपासूनची शिवसेनेची साथ सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या दोन नेत्यांच्या पक्ष प्रवेशाला नाशिक भाजपकडून कडाडून विरोध होत आहे. नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे. या दोघांना पक्षात घेण्यासासंबंधी माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे. नाशिक भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध आहे. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या पक्ष प्रवेशावरुन नाशिक भाजप कार्यालयाबाहेर वादाची स्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक भाजप कार्यालयाबाहेर एक हाय वोलेटेज ड्रामा पहायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही अशी भूमिका देवयानी फरांदे यांनी घेतली आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाच्यावेळी दोन्ही गट आमने-सामने येण्याची भिती आहे. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना भाजपत घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशाला विरोध होत आहे.

हे त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी आलेत

“काहीही झालं, तरी हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही. आम्ही सगळी तयारी करायला लावली. ते दरवाजा ठोठावत आहेत. पण भाजपचा दरवाजा निष्ठावंतांसाठी उघडणार. गिरीश महाजन, देवयानी फरांदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी आलेत” अशी टीका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान संजय राऊत यांनी टि्वट करुन विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. पण काल संध्याकाळीच दोन्ही नेत्यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमधील दिग्गज नेते मानले जातात. शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. भाजपने एकाचवेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का दिला आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल