Gunratna Sadavarte : उठ दुपारी अन् घे सुपारी, कुठं गेली… ठाकरे बंधूंच्या युतीवर गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबोल
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर वकील गुणरत्न सदावर्ते आणि योगेश कदम यांनी जोरदार टीका केली आहे. सदावर्ते यांनी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंवर पूर्वी केलेल्या टीकेवरून प्रश्न विचारला, तर कदम यांनी शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारले गेल्याचे म्हटले. दुसरीकडे, काँग्रेस वंचित आणि सीपीआयएमसोबत जागावाटपाबाबत अंतिम टप्प्यात चर्चा करत आहे, असे सचिन सावंत यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. या युतीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरेंना पूर्वी हिणवणारे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते आता काय उत्तर देणार, असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. याच युतीवर योगेश कदम यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, भावनिक साद घालून मराठी मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र, मराठी माणूस आता हुशार झाला असून, त्याला सगळे कळते. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व शिवसैनिकांनी आणि मुंबईतील मराठी माणसांनी स्वीकारले आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले. नगरपंचायत
Published on: Dec 25, 2025 12:28 PM
Latest Videos
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक

