AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ

केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी… वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ

| Updated on: Jun 30, 2026 | 6:11 PM
Share

मावळमधील केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासादरम्यान आता एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी तब्बल 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामुळे न्यायालयीन आणि कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

वडगाव मावळ न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सिया गोयलने, “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत,” असे सांगितल्याची माहिती समोर आली. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी दावा केला आहे की, साहिल गोयलने त्यांच्यावर खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केले. त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे त्यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

तसेच साहिल गोयलने सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारचे आरोप करणार नाही, असे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणीही नोटिशीत करण्यात आली आहे. आता साहिल गोयल या नोटिशीला काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 30, 2026 06:11 PM

Follow Us