‘प्रत्येक जातीची जनगणना व्हावी’, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी

मदास आठवले यांनी प्रत्येक जातीची जनगणना व्हावी अशी भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

'प्रत्येक जातीची जनगणना व्हावी', केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 4:01 PM

कोल्हापूर: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जनगणनेबाबत मोठी मागणी केली आहे. प्रत्येक जातीची जनगणना व्हावी, असं मत आठवले यांनी मांडलं आहे. कोणत्या जातीचा किती टक्का आहे हे समजत नाही. त्यामुळे 2021 जनगणना जातनिहाय व्हावी, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची माहिती आठवले यांनी कोल्हापुरात बोलताना दिली. (Ramdas Athavale Demand’s to conduct caste wise census)

यापूर्वी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली होती. आता रामदास आठवले यांनी प्रत्येक जातीची जनगणना व्हावी अशी भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयही मराठा समाजाचा विचार करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आर्थिक निकषावरुन आरक्षणाला विरोध

महाराष्ट्रातील काही नेते आणि विचारवंतांकडून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याला आपला विरोध असल्याचं रामदास आठवले म्हणाले. समाजातून जातीव्यवस्था संपवा, मग आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, अशी भूमिका आठवले यांनी घेतली आहे. अनेक जातींवर आजही अन्याय होतो, त्यामुळे जातीच्या आधारावरच आरक्षण असलं पाहिजे असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

जातीनिहाय जनगणनेची पटोलेंचीही भूमिका

जनगणना ही जातीनिहाय करणं आवश्यक आहे. जातीपातीतील संघर्ष टाळण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. तो आपण घेतला आणि विधानसभेला जातीनिहाय जनगणनेचं महत्वं पटवून दिल्याचं, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नोव्हेंबरमध्ये साताऱ्यातील वाई इथं बोलताना सांगितलं होतं. जातीनिहाय जनगणना झाली तर सर्वसामान्यांना न्याय देणं शक्य होईल. जातीजातीत भांडणे होणार नाही. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षणाचा लाभ देता येईल, असंही पटोले म्हणाले होते.

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाज आग्रही

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजही आग्रही आहे. अनेक ओबीसी नेत्यांनी सातत्यानं ही मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसी समाजानं ही मागणी केली होती. ओबीसी सामाजाची जातीनिहाय जनगणना करावी. ज्यामुळे ओबीसींची प्रत्यक्ष संख्या समजण्यास मदत होईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव मदत देण्यात यावी. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. सर्व प्रकारच्या सेवा भरतींवरील स्थगिती उठवावी, अशा मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत.

संबंधित बातम्या:

Ramdas Athavale Demand’s to conduct caste wise census

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.