कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर

| Updated on: May 12, 2020 | 2:32 PM

आज रत्नागिरीतील 5 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली (Ratnagiri Corona Patient Increasing) आहे.

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर
Follow us on

रत्नागिरी : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत (Ratnagiri Corona Patient Increasing) आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली होती. मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज रत्नागिरीतील 5 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे.

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. या सर्व (Ratnagiri Corona Patient Increasing) चाकरमान्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी रत्नागिरीत जिल्ह्यातील 5 जण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर पोहोचला होता.

मात्र आठवडाभरात रत्नागिरीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. आजही रत्नागिरीत 5 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक 13 रुग्ण हे मंडणगड तालुक्यातील आहे. मुंबईतून मंडणगडला चालत येण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. मुंबई ते मंडणगड हे अंतरसुद्धा जवळ आहे. त्यामुळे बहुतेक चाकरमानी या ठिकाणी लपून छपून चालत आले. त्यामुळे मंडणगड तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला पहायला मिळत आहे.

मुंबई आणि पुण्याहून कोकणात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये विनापरवानगी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता कोकणात देखील याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतून कोकणात येणारे चाकरमानीच सध्या कोरोनाचे वाहक ठरत आहेत. मुंबईकर कोकणात येतात मात्र कोकणातील सर्व आरोग्य यंत्रणेवर याचा ताण निर्माण झाला आहे.

त्यामुळे या लोकांना क्वारंटाईन करुन ठेवल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी गावातील वाडी स्तरावर तरुणांचे कृती दल तयार केले जाणार आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली.

सध्या ग्राम कृती दल हे काम करत असलं तरी आता वाडीनुसार लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्याकरिता तरुणांची मदत घेत वाडी स्तरावर तरुणांचे कृती दल तयार करणार आहेत. त्याशिवाय, स्थानिक बाजारपेठा उघडण्याबाबतचे अधिकार देखील प्रांताधिकार यांना दिले (Ratnagiri Corona Patient Increasing) आहेत.

संबंधित बातम्या : 

भवानी पेठेत कोरोनाचा कहर, 500 च्या वर कोरोनाबाधित रुग्ण

मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, दिवसेंदिवस रुग्ण वाढतेच