पंतप्रधान मोदींपासून मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत… ट्विटरवर कोण किती अ‍ॅक्टिव, रिपोर्टमध्ये खुलासा

Report shows Narendra Modi Sonu Sood Top Indian Twitter engagement in October

पंतप्रधान मोदींपासून मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत… ट्विटरवर कोण किती अ‍ॅक्टिव, रिपोर्टमध्ये खुलासा
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 5:41 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असणारे लोक आपला बराच वेळ या ठिकाणी घालवतात. यात सर्वसामान्यच नाही तर अगदी मोठमोठे सेलिब्रेटी देखील आघाडीवर आहेत. यात राजकारणापासून उद्योग क्षेत्रापर्यंतच्या दिग्गजांचा समावेश आहे. हे सर्व ट्विटर नेमके किती अ‍ॅक्टिव असतात याबाबत एक अहवाल समोर आलाय. यात कोण किती अ‍ॅक्टिव आहे याची आकडेवारीच जाहीर करण्यात आलीय. सोशल मीडिया अ‍ॅनालिटिक्स कंपनी ट्विटेटने (Twitteet) आपला ऑक्टोबर महिन्याचा अहवाल जाहीर केलाय. यातून हे समोर आलंय (Report shows Narendra Modi Sonu Sood Top Indian Twitter engagement in October).

या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता सोनू सूद यांची ट्विटरवरील एंगेजमेंट सर्वात जास्त आहे. ट्विटेटने पहिल्यांदाच 20 कॅटेगरीत सोशल मीडिया अ‍ॅनालिटिक्सचा अहवाल तयार करण्यात आलाय. यात दैनंदिन आणि मासिक ट्विटर एंगेजमेंटचा समावेश आहे. यात राजकीय व्यक्ती (पक्षनिहाय), पत्रकार, उद्योगपती/गुंतवणूकदार, खेळाडू (क्रिकेट आणि इतर खेळ), अभिनेते (बॉलिवूड अँड प्रादेशिक), लेखक, शेफ आणि कॉमेडियन यांचा समावेश आहे. या यादीत प्रत्येक वर्गवारीच्या टॉपच्या व्यक्तीचं नाव देण्यात आलं आहे.

वर्गवारीनुसार ‘टॉप विनर्स’

1. पॉलिटेशियन – नरेंद्र मोदी – 72,15,913 ट्विटर एंगेजमेंट

2. क्रिकेटर – विराट कोहली – 24,65,918 ट्विटर एंगेजमेंट

3. बॉलिवूड – सोनू सूद – 24,36,601 ट्विटर एंगेजमेंट

4. जर्नालिस्ट – दीपक चौरसिया – 18,88,720 ट्विटर एंगेजमेंट

5. कॉमेडियन – कुणाल कामरा – 11,46,111 ट्विटर एंगेजमेंट

6. रिजनल सिनेमा स्टार – महेश बाबू – 7,32,964 ट्विटर एंगेजमेंट

7. लेखक – आनंद रंगनाथन – 5,36,874 ट्विटर एंगेजमेंट

8. स्पोर्ट्स स्टार (नॉन – क्रिकेट) – विजेंदर सिंह – 4,27,006 ट्विटर एंगेजमेंट

9. बिजनेस हेड – आनंद महिंद्रा – 4,08,882 ट्विटर एंगेजमेंट

10. टीव्ही स्टार – सिद्धार्थ शुक्ला – 3,90,901 ट्विटर एंगेजमेंट

11. फाऊंडर – कुणाल शाह – 60,093 ट्विटर एंगेजमेंट

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7.2 मिलियनपेक्षा अधिकच्या ट्विटर एंगेजमेंटसह भारतातील सर्वात आघाडीचे व्यक्ती ठरले आहे. राजकीय वर्गवारीसाठी भारतीय ट्विटर एंगेजमेंट रँकिंगमध्ये मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी 3.5 मिलियन एंगेजमेंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि चौथ्या क्रमांकावर प्रियंका गांधी वाड्रा आहेत.

बॉलिवूड

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूद यांच्या मदत अभियानाने त्यांची पॉप्युलॅरिटीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये सोनू सूद 2.4 मिलियन ट्विटर एंगेजमेंटसह टॉपवर आहेत. शाहरुख खान 7.3 लाख एंगेजमेंटसह दुसऱ्या क्रमांकावर आणि 6.72 लाख एंगेजमेंटसह अक्षय कुमार तिसऱ्या स्थानी आहे.

कॉमेडियन

कॉमेडियन वर्गवारीत कुणाल कामरा 1.1 मिलियन ट्विटर एंगेजमेंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 4.92 लाख एंगेजमेंटसह आशीष चंचलानी आणि 3.2 लाख ट्विटर एंगेजमेंटसह तिसऱ्या क्रमांकावर वीर दास आहे.

क्रीडा

विराट कोहलीने 2.4 कोटी ट्विटर एंगेजमेंटसह क्रिकेट वर्गवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे. 1.9 मिलियन एंगेजमेंटसह सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्ये ऑलम्पिक पदक विजेता आणि प्रो-बॉक्सर विजेंद्र सिंह 4.27 लाख एंगेजमेंटसह टॉपवर आहे.

हेही वाचा :

ट्विटरवर RBI सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बँक, नेमकं कारण काय?

इम्रान सरकारच्या नव्या ‘इंटरनेट पॉलिसीवर’ तीव्र नाराजी, गूगल, फेसबुक, ट्विटरचा पाकिस्तान सोडण्याचा इशारा

लेह-लडाखला चीनचा भाग म्हणणाऱ्या ट्विटरकडून भारताची लेखी माफी

Report shows Narendra Modi Sonu Sood Top Indian Twitter engagement in October

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.