Republic Day 2020 : भारतीय संस्कृती आणि सैनिकांचा दैदीप्यमान पराक्रम सोहळा

देशात आज 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीचं राजपथ पूर्णपणे सज्ज झालं आहे.

Republic Day 2020 : भारतीय संस्कृती आणि सैनिकांचा दैदीप्यमान पराक्रम सोहळा
Follow us
| Updated on: Jan 26, 2020 | 8:39 AM

नवी दिल्ली : देशात आज 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीचं राजपथ पूर्णपणे सज्ज झालं आहे (Republic Day 2020). राजपथावर देशाच्या विविध भागांतील संस्कृतीचं दर्शन होत आहे. याशिवाय भारतीय सैन्याची परेड आणि विविध पराक्रम संपूर्ण जगाला बघायला मिळत आहे (Republic Day 2020).

प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये वायूदलाच्या विविध लढाऊ विमानांचंदेखील प्रदर्शन असणार आहे. यामध्ये वायुदलात नुकतंच दाखल झालेलं ‘चिनूक’ आणि ‘अपाचे’ या लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश असणार आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून सुरक्षेची संपूर्ण काटेकोर जबाबदारी घेण्यात आली आहे. सुरक्षेसाठी हजारो पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क आहेत.

राजपथावर 22 चित्ररथ देशातील विविध संस्कृतीचं दर्शन घडवणार आहेत. यामध्ये 16 चित्ररथ हे देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील. तर 6 चित्ररथ हे विविध मंत्रालय आणि विभागांचे असतील.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटच्या राष्ट्रीय समर स्मारकला जाऊन देशासाठी शहीद झालेल्या जावानांना श्रद्धांजली वाहिली. दरवर्षी अमर जवान ज्योती येथे जाऊन देशाचे पंतप्रधान शहीद जावानांना श्रद्धांजली अर्पण करतात. मात्र, पहिल्यांदाच पंतप्रधान राष्ट्रीय समर स्मारकला जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर राजपथावरील परेड कार्यक्रम पाहण्यासाठी सलामी मंचवर जातील.

वायुसेनेचे 144 जवान आज परेडमध्ये सहभागी झाले आहेत. वायूसेनेकडून ‘राफेल’, ‘तेजस’ या लाढाऊ विमानांसह हलके लढाऊ हेलिकॉप्टर, आकाश मिसाईल प्रणाली आणि अस्त्र मिसाईलचे मॉडेल यांचे प्रदर्शन होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) पथकातील उपग्रहभेदी क्षेपणास्त्र ‘मिशन शक्ती’चं देखील आज प्रदर्शन आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.