Sushant Singh | हो, शवगृहात गेल्यावर पार्थिवाला सॉरी बोलले, पहिल्या मुलाखतीत रियाची रोखठोक भूमिका

| Updated on: Aug 29, 2020 | 8:29 AM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अनेक मोठे खुलासे केले आहेत (Rhea Chakraborty on Sushant Singh death).

Sushant Singh | हो, शवगृहात गेल्यावर पार्थिवाला सॉरी बोलले, पहिल्या मुलाखतीत रियाची रोखठोक भूमिका
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अनेक मोठे खुलासे केले आहेत (Rhea Chakraborty on Sushant Singh death). एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रियाने आपल्यावरील सर्व आरोपांवर रोखठोक भूमिका मांडली. हो, शवगृहात गेल्यावर पार्थिवाला सॉरी बोलले होते. कारण त्यावेळी सॉरीशिवाय काय बोलणार? असं मत रियाने व्यक्त केलं.

रिया चक्रवर्ती म्हणाली, “हो मी शवगृहात सुशांतच्या पार्थिवाला सॉरी बोलले. तेथे जाऊन दुसरं कुणी काय करु शकतं? त्याला आपला जीव द्यावा लागला होता, त्यासाठी मी त्याला ‘आय एम सॉरी’ म्हणाले. आजही अशाप्रकारच्या गोष्टी होत आहेत. त्याच्या मृत्यूला चेष्टा करुन टाकण्यात आलं आहे मी त्यासाठीही सॉरी म्हणते. आज त्याच्या कामाची आठवण काढली जात नाहीये यासाठी मी सॉरी आहे.”

हेही वाचा : सुशांत-रियाचे 8 जूनला कडाक्याचे भांडण, रियाने 8 हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या : सिद्धार्थ पिठाणी

मी शवगृहात 3 ते 4 मिनिटे थांबली होते. कारण तोपर्यंत शवविच्छेदन व्हायचं होतं. मात्र, जेव्हा सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेकडे नेण्यात येत होता तेव्हा मी सॉरी म्हणाले आणि त्याच्या पायांना स्पर्श केला, असंही रियाने आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

‘कोणत्याही हार्ड ड्राईव्हवरील माहिती डिलिट केली नाही’

रियाने यावेळी तिच्यावरील हार्ड ड्राईव्हमधील डाटा डिलिट केल्याच्या आरोपावरही खुलासा केला. ती म्हणाली, “हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. अशी कोणतीही हार्ड ड्राईव्ह असल्याची माहिती मला नाही. जोपर्यंत मी सुशांतसोबत होते तोपर्यंत कोणताही व्यक्ती असं काही करायला आली नव्हती. मी सुशांतच्या घरुन गेल्यानंतर तेथे सुशांतची बहिण आली होती. जर असं काही झालं असेल तर तिला याविषयी विचारायला हवं. माझ्या उपस्थितीत असं काहीही घडलेलं नाही.”

हेही वाचा : सुशांत स्वतः ड्रग्ज घ्यायचा की त्याला दिलं जायचं? सीबीआयचा नोकरांकडे मोर्चा, वॉचमनचीही चौकशी

सिद्धार्थ पिठाणीने असं काही सांगितलं असेल यावर माझा विश्वास नाही. मला वाटतं याआधी रचलेल्या गोष्टींप्रमाणेच आता आणखी एक नवी खोटी गोष्ट रचली जात आहे. प्रत्येक दिवशी एक गोष्ट रचली जात आहे. या गोष्टी पूर्णपणे निराधार आहेत, असंही रियाने सांगितलं. सुशांत गेल्या वर्षीपासून नव्हे तर 2013 पासून डिप्रेशनमध्ये होता. यामुळे सुशांत मुंबईत डॉ. शेट्टींकडून उपचार घेत होता. सुशांतला विमानात बसण्याची भीती होती. त्या डॉक्टरांनीच सुशांतला विमान प्रवासापूर्वी मोडाफिनी औषधं घ्यायला दिलं होतं, असंही तिने यावेळी नमूद केलं.

रिया म्हणाली, “सुशांतला राजेशाही जीवन आवडायचं. त्याची जीवनशैली राजासारखी होती. तो तसं जगण्यासाठी भरपूर खर्च करायचा. तो एक स्टार होता. त्याने एकदा मित्रांसोबत फिरायला गेला असता खासगी जेट घेऊन गेला. त्यावेळी त्याने त्या ट्रिपवर 70 लाख खर्च केले. त्यामुळे मी त्याचे पैसे खर्च केले हे खोटं आहे. तो स्वतः तसं जगत होता.”

संबंधित बातम्या :

रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार

दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग, कॉल नेमके कोणी केले? तपास नाही

Sushant Singh Rajput Case Live | सिद्धार्थ, नीरज, रजत डीआरडीओ कार्यालयात, समोरासमोर बसवून सीबाआयकडून चौकशी

Rhea Chakraborty on Sushant Singh death