Sushant Singh Rajput Case Live | सिद्धार्थ, नीरज, रजत डीआरडीओ कार्यालयात, समोरासमोर बसवून सीबाआयकडून चौकशी

रिया सह तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती यांना लवकरच समन्स पाठवलं जाण्याची शक्यता आहे

Sushant Singh Rajput Case Live | सिद्धार्थ, नीरज, रजत डीआरडीओ कार्यालयात, समोरासमोर बसवून सीबाआयकडून चौकशी
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 5:35 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबालाही (CBI Investigate Rhea Chakraborty And His Family) चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. सीबीआय त्यांची चौकशी करणार आहेत. रिया सह तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती यांना लवकरच समन्स पाठवलं जाण्याची शक्यता आहे (CBI Investigate Rhea Chakraborty And His Family).

आज सीबीआयचं एक पथक वॉटर सेटोन रिसॉर्ट येथे पोहोचलं. या ठिकाणी रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह दोन महिने थांबले होते. इथेच आध्यात्मिक रोग बरे करणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यात आलं होतं. त्याने 22 आणि 23 नोव्हेंबरला सुशांतची भेट घेतली होती.

सिद्धार्थ, निरज आणि सीए रजतची सीबाआयकडून चौकशी

आज डीआरडीओ कार्यालयात सकाळपासून सिद्धार्थ पिठाणी, कूक निरज आणि सीए रजत मेवाती या तिघांची सीबीआय चौकशी करत आहे. सिद्धार्थ पिठाणी आणि कूक निरज हे काल ही सीबीआय टीम सोबत होते. मात्र, आज त्यांच्यासोबत रजत मेवाती ही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिघांना आज समोरासमोर बसवून चौकशी केली जात आहे.

यापूर्वी सिद्धार्थ पिठाणी, निरज आणि दीपेश सावंत हे तिघे सीबीआय टीम सोबत होते. या तिघांनी मुंबई पोलिसांना जी माहिती किंवा स्टेटमेंट दिलं होतं आणि सीबीआयला जे स्टेटमेंट दिलं आहे त्यात तफावत असल्याची माहिती आहे .

म्हणूनच सीबीआय या तिघांकडून सत्य काय ते काढण्यात प्रयत्त करत आहेत. अजूनही डीआरडीओ गेस्ट हाउसमध्ये सिद्धार्थ पिठाणी, कूक नीरज आणि सीए रजत मेवाती या तिघांकडूंन सीबीआय अधिकारी तपास करत आहेत. मात्र, लवकरच सीबीआय टीम काही निष्कर्षावर पोहोचणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

LIVE UPDATE :

  • आज दुपारी सीबीआयची एक टीम वांद्रे पाली हिलमधल्या महिंद्रा कोटक बँकेत गेली होती. आर्थिक गडबड असल्याचा आरोप आहे, त्यामुळे सीबीआय फायनेंशिअल अँगलने ही तपास करत आहेत.
  • सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात गेली आहे.सुशांतचं शवविच्छेदन कूपरमध्ये झालं होतं. यापूर्वी ही सीबीआय अधिकारी कूपरमध्ये जाऊन तपास करुन आले आहेत. मात्र, आज पुन्हा एक टीम कूपर मध्ये गेली.
  • सध्या सीबीआय कडून DRDO कार्यालयात सकाळ पासून सिद्धार्थ पिठाणी, रजत मेवाती, निरज सिंहची चौकशी सुरु आहे
  • सूत्रांच्या माहितीनुसार, रिसॉर्ट तर्फे सीबीआयच्या टीमला महत्त्वाचे डॉक्युमेन्ट पुरवले आणि इतर माहिती जसे सुशांत कधी आला होता, किती दिवस थंबला हे सर्व दिलं गेलं आहे. मात्र, सीबीआयची टीम अधिक माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.
  • वॉटर सेटोन रिसॉर्टच्या मॅनेजरची चौकशी सुरु
  • सुशांतच्या सीएचीही चौकशी होणार
  • आम्हाला कुठलाही समन्स मिळालेला नाही, रियाच्या वकील माने-शिंदे यांचा खुलासा, समन्स मिळालं तर आम्ही नक्की हजर होऊ
  • सुशांतच्या कुक नीरजची सलग चौथ्या दिवशी सीबीआयकडून चौकशी

सीबीआयने रियाच्या चौकशीची पूर्ण तयारी केली आहे. रियासाठी सीबीआयने प्रश्नांची मोठी यादी तयार करुन ठेवली आहे (CBI Investigate Rhea Chakraborty And His Family).

सीबीआय रियाला कोणते प्रश्न विचारु शकते?

– सुशांतची आणि तुझी भेट कशी झाली? तुमचं नातं पुढे कसं गेलं? तुम्ही दोघे लग्न करणार होते का?

– 8 जूनला असं काय झालं की तुला सुशांतचं घर सोडावं लागलं आणि त्याचा नंबरही ब्लॉक करावा लागला?

– सुशांत तणावाखाली असल्याची थ्योर काय आहे? सुशांतसोबत राहत अशताना तू त्याच्यासाठी काय केलं?

– सुशांतच्या कुटुंबासोबत तुझे संबंध कसे होते, त्यांनी तुझ्यावर जे आरोप लावले आहेत त्याबाबत काय सांगशील?

– सुशांतसोबत शेवटचं बोलणं काय झालं, काय तुला वाटतं की सुशांत आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकतो?

– सुशांतच्या कंपन्यांमध्ये तुझी भागीदारी काय होती आणि तुझा नेमकी भूमिका काय होती? कंपनीचे सर्व निर्णय तू घेत होती का?

– सुशांतचं घर, त्याचं बँक खातं आणि घरी काम करणाऱ्यां लोकांवर काय तुझा कंट्रोल होता?

– युरोप ट्रीपदरम्यान काय झालं? सिद्धार्थ आणि नीरजने सांगितलं की तिथून आल्यानंतर सुशांत तणावाखाली होता.

– सिनेमांपासून झालेली कमाई आणि त्यांच्या खर्चावरुनही प्रश्न विचारले जाऊ शकतात.

– कॉल डिटेल्स समोर ठेवूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात.

CBI Investigate Rhea Chakraborty And His Family

संबंधित बातम्या :

सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप, संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर

Sushant Singh | फ्लॅटमधील घडामोडी ते रियासोबतचं नातं, सुशांतचा रुममेटवर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.