जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे भारताशी अनोखे ‘कनेक्शन’, रितेश देशमुखचा दावा!

| Updated on: Nov 09, 2020 | 12:26 PM

रितेशचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे. चाहते त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहेत.

जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे भारताशी अनोखे ‘कनेक्शन’, रितेश देशमुखचा दावा!
Follow us on

मुंबई : सध्या सगळीकडे अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे (American Election) वारे वाहत आहेत. बॉलिवूडकरांनीही या निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. या सगळ्यातच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने ट्विट करत, अमेरिकेच्या निवडणुकीचे आणि जो बायडन (Joe Biden)-कमला हॅरिस (Kamala Harris) यांचे भारताशी असलेले अनोखे कनेक्शन समोर आणले आहे. रितेशच्या या ट्विटवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत, गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत (Riteish deshmukh hilarious tweet on American Election joe biden and kamala harris bihar connection).

सध्या भारतात बिहार निवडणुकीचा माहोल गाजत आहे. अमेरिका आणि बिहार या दोन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुखचे ट्विट सध्या चांगलेच गाजते आहे. या ट्विटमध्ये रितेशने जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे अनोखे कनेक्शन सांगितले आहे. त्याच्या या मजेदार ट्विटवर सगळ्यांच्याच गमतीदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

रितेश देशमुखचे ट्विट

रितेश देशमुखने जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे नाव जोडून चक्क ‘बिहार’ हा शब्द तयार केला आहे. ‘Biden+harris=?’, असे म्हणत त्याने हे ट्विट शेअर केले आहे.

रितेशचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे. चाहते त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत जो बायडन अमेरिकेचे 46वे अध्यक्ष बनले आहेत. तर, मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची उप राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. अमेरिकेत या निवडणुकीचा आनंद साजरा केला जात असतानाच, भारतातही कमला हॅरिस यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे (Riteish deshmukh hilarious tweet on American Election joe biden and kamala harris bihar connection).

डोनाल्ड ट्रम्प यांचा दारूण पराभव!

अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांना 279 इलेक्टोरल मते मिळाली, तर ट्रम्प यांना अवघी 214 इलेक्टोरल मते मिळाली. जो बायडन यांच्याबरोबर कमला हॅरिस देखील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून त्यांच्या नावे विक्रम प्रस्थापित झाला आहे.

“अमेरिकेसारख्या महासत्ताधीश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुमचा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बायडन यांच्याबरोबरच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विजयी झाल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. कमला हॅरिस यांनी विजयानंतर देशाला संबोधित केले. कमला हॅरिस यांनी विजयाचे श्रेय त्यांच्या आई श्यामला गोपालन यांना दिले आहे. “श्यामला गोपालन यांनी अमेरिकेत मोठा संघर्ष केला, त्या वयाच्या 19व्या वर्षी भारतातून अमेरिकेत आल्या होत्या.”, असं कमला हॅरिस यांनी सांगितले.

(Riteish deshmukh hilarious tweet on American Election joe biden and kamala harris bihar connection)

संबंधित बातम्या :

Kamala Harris | ‘तिने’ही इतिहास घडवला! जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरिस?

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष