शिष्य ‘महाराष्ट्र केसरी’च्या फायनलमध्ये, पण गुरुच्या घरी चोरी!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

कोल्हापूर : हिंदकेसरी पैलवान दिवंगत गणपत आंदळकर यांच्या कोल्हापुरातील घरी चोरी झाल्याची घटना घडलीय. नातेवाईक बाहेर गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडलं. यामध्ये चोरट्यांनी सहा तोळे सोने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. घराच्या मागच्या बाजूस असलेला लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे आंदळकर यांचा शिष्य बाळा रफिकने महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक […]

शिष्य महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये, पण गुरुच्या घरी चोरी!
Follow us on

कोल्हापूर : हिंदकेसरी पैलवान दिवंगत गणपत आंदळकर यांच्या कोल्हापुरातील घरी चोरी झाल्याची घटना घडलीय. नातेवाईक बाहेर गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडलं. यामध्ये चोरट्यांनी सहा तोळे सोने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. घराच्या मागच्या बाजूस असलेला लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे आंदळकर यांचा शिष्य बाळा रफिकने महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

आंदळकर यांना मिळालेली मौल्यवान पारितोषिके शाबूत असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. एकीकडे जालन्यात महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पडत आहेत आणि दुसरीकडे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या घरात चोरीची घटना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच आंदळकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पत्नी नलिनी आंदळकर पुण्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या आपल्या मुलाच्या घरी राहायला आहेत. कोल्हापुरातील या घरामध्ये कुणीही राहत नव्हतं. याचाच अंदाज घेत चोरट्यांनी मध्यरात्री त्यांचं घर फोडलं.

शिष्याची महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक

महाराष्ट्र केसरीसाठी बाळा रफिकची लढत पुण्याचा पैलवान आणि गतविजेता अभिजित कटकेसोबत होणार आहे. गादी गटातून सुवर्णपदक पटकावत पुण्याच्या अभिजित कटके याने अंतिम फेरीत धडक मारली. अभिजित कटके हा गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेता असून सोलापूरच्या रवींद्र शेंडगे यांच्यासोबत त्याची गादी गटातील अंतिम सामन्याची लढत झाली. वाचा पुण्याचा पैलवान अभिजित कटके पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’साठी मैदानात!

अतिशय चुरशीच्या लढ्यात अभिजित कटके याने चितपट करून रवींद्र शेंडगे याच्यावर विजय मिळवला. तर बुलडाण्याचा बाळा रफिक याने माती गटातून सुवर्णपदक पटकावलं. बाळा रफिक याने रत्नागिरीच्या संतोष दोरवड याचा 5-0 ने पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं.

बाळा रफिक शेख हा न्यू मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. वयाच्या 13 व्या वर्षी कुस्तीसाठी घर सोडून कोल्हापुरात दाखल झाला होता. हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा तो शिष्य आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोबत त्याने कुस्तीचे धडे घेतले आहेत. बाळा रफिक शेख महाराष्ट्र केसरीची गदा पटकावेल, असा विश्वास चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलाय.