गाईचे तूप नाकात टाका किंवा गोमूत्र प्यायला द्या; कोरोना बरा होईल : संभाजी भिडे

| Updated on: Mar 30, 2020 | 9:30 PM

गाईच्या तुपाने भरलेलं बोट नाकात फिरवलं (Sambhaji Bhide on Corona) किंवा गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील", असा दावा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला.

गाईचे तूप नाकात टाका किंवा गोमूत्र प्यायला द्या; कोरोना बरा होईल : संभाजी भिडे
Follow us on

सांगली : “गाईच्या तुपाने भरलेलं बोट नाकात फिरवलं (Sambhaji Bhide on Corona) किंवा गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील”, असा दावा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला आहे. संभाजी भिडे यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला (Sambhaji Bhide on Corona) .

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

“गोमूत्र आणि गायीचं तूप हे अतितीव्र जंतुनाशक आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाधित रुगणांवर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा. गाईच्या तुपाने भरलेला बोट नाकात फिरविला किंवा गाईचे गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे होतील. त्यांच्या खाण्यापिण्यातसुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा”, असा सल्ला संभाजी भिडे यांनी दिला.

“इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करा. सांगलीच्या एकाच कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा”, अशी मागणी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

“चीन हा जगातील सर्वात नीच देश आहे. चीनवर पुढील पाच वर्ष सर्व जगाने बहिष्कार टाकला पाहिजे. चीन मेला काय, जगला काय बघू नये, चीनशी संबंध तोडावेत”, असंही भिडे म्हणाले.

“चीनचा हलकटपणा जाईल अस मला वाटत नाही. चीनचा हलकटपणा जायचा असेल, तर चीनवर अत्यंत कठोर पावले उचलली पाहिजेत. चीनला सर्व जीवनावश्यक मार्गाने संपवले पाहिजे”, अशा भावनाही संभाजी भिडे यांनी व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या :

इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी