इस्लामपुरातील 'कोरोना'बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी

चीन हा जगातील सर्वात नीच देश आहे. चीनवर पुढील पाच वर्ष सर्व जगाने बहिष्कार टाकला पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले. (Sambhaji Bhide on Islampur Corona Patients)

इस्लामपुरातील 'कोरोना'बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी

सांगली : इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करा, अशी मागणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडेंनी केली आहे. सांगलीच्या एकाच कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. (Sambhaji Bhide on Islampur Corona Patients)

इस्लामपुरातील त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्या अन्वये बंदिस्त करा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. सांगलीत कोरोनामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धर्मवीर स्वागत रॅली रद्द करण्यात आली होती.

चीन हा जगातील सर्वात नीच देश आहे. चीनवर पुढील पाच वर्ष सर्व जगाने बहिष्कार टाकला पाहिजे. चीन मेला काय, जगला काय बघू नये, जमीन मार्गाने, आकाशातून चीनशी संबंध तोडावेत, असंही भिडे म्हणाले.

चीनचा हलकटपणा जाईल अस मला वाटत नाही. चीनचा हलकटपणा जायचा असेल, तर चीनवर अत्यंत कठोर पावले उचलली पाहिजेत. चीनला सर्व जीवनावश्यक मार्गाने संपवले पाहिजे, अशा भावनाही संभाजी भिडे यांनी व्यक्त केल्या.

एकाच कुटुंबातील कोरोनाबाधित

सांगली जिल्ह्यात 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे इस्लामपुरात जे नवे रुग्ण आढळत आहेत, ते पूर्वीच्याच्या चार कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचं कुटुंब 35 जणांचं आहे.

या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचं आधी समोर आलं. हे चौघे सौदी अरेबियाहून हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, 25 मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या संपर्कातील आणखी 12 जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 27 जणांना आधी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. इस्लामपूर शहरातील 337 नागरिक कोरोनाबाधित कुटुंबियांच्या संपर्कात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

(Sambhaji Bhide on Islampur Corona Patients)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *