Sameet Thakkar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह कमेंट, अखेर समीत ठक्करला जामीन मंजूर

| Updated on: Nov 16, 2020 | 4:12 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला जामीन मंजूर झाला आहे. (Sameet Thakkar granted bail by Mumbai Magistrate's Court)

Sameet Thakkar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह कमेंट, अखेर समीत ठक्करला जामीन मंजूर
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं समीत ठक्करला जामीन मंजूर केला. समीत ठक्करच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी सुनावणी झाली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर समीत ठक्करच्या याचिकेवर सुनवाणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं ठक्करला मुंबईतील न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. (Sameet Thakkar granted bail by Mumbai Magistrate’s Court)

समीत ठक्करला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळे 24 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयानं समीत ठक्करची 25 हजार रुपयांच्या हमीवर मुक्तता केली आहे.


1 जुलै 2020 ला नितीन तिवारी या शिवसेना पदाधिकाऱ्यानं समीत ठक्कर विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये समीत ठक्करनं ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईत समीत ठक्कर विरोधात मुंबईतील धर्मेंद्र मिश्रा यांनी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. बीकेसी सायबर सेलकडे देखील ठक्कर विरोधात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये समीत ठक्करवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. (Sameet Thakkar granted bail by Mumbai Magistrate’s Court)

समीत ठक्करला राजकोटमधून अटक

समीत ठक्करला 24 ऑक्टोबरला सीताबर्डी पोलीस ठाणे नागपूर यांच्याकडून राजकोट येथे अटक करण्यात आली होती.ठक्करला 26 ऑक्टोबरला नागपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. नागपूर न्यायालयानं ठक्करला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची पोलीस कोठडी 2 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

नागपूर न्यायालयानं समीत ठक्करला न्यायालयीन कोठडी सुनावली. 2 नोव्हेंबरला समीत ठक्करला नागूपर न्यायालयानं जामीन मंजूर केला. यानंतर लगेचच मुंबई पोलिसांनी समीत ठक्करला अटक केली. 3 नोव्हेंबरला समीत ठक्करला गिरगावच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्याला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 10 नोव्हेंबरला व्हीपी रोड पोलीस ठाण्यातील तक्रारीप्रकरणी जामीन मंजूर झाला. यानंतर लगेचच बीकेसी सायबर सेलनं अटक केली.

बीकेसी पोलिसांनी समीत ठक्करला अटक केल्यानंतर 11 नोव्हेंबरला न्यायालयात हजर केले. सुरुवातीला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडी 16 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

संबंधित बातम्या: 

बारामती पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबईत मिठाई देतो सांगून व्यापाऱ्याला लुटलं, दोघांना अटक, तर एक चोर धारदार चॉपर दाखवून फरार

(Sameet Thakkar granted bail by Mumbai Magistrate’s Court)