‘कोरोना’ला हरवणारी 94 वर्षीय आजी, महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध रुग्णाची कोरोनावर मात

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 94 वर्षांच्या आजीला कोरोनाची लागण झाली होती. (Sangli 94 Years Old Lady Corona Free)

कोरोनाला हरवणारी 94 वर्षीय आजी, महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध रुग्णाची कोरोनावर मात
| Updated on: May 13, 2020 | 3:29 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील 94 वर्षांच्या महिलेने ‘कोरोना’वर मात केली. मिरजमधील ‘कोरोना’ रुग्णालयातून आजीबाईंना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवून शुभेच्छा देत आजीला डिस्चार्ज देण्यात आला. ही महिला महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध कोरोनाबाधित रुग्ण होती. (Sangli 94 Years Old Lady Corona Free)

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 94 वर्षांच्या आजीला कोरोनाची लागण झाली होती. या वृद्ध महिलेला मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. या महिलेवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. तिची काळजी घेण्यात आली.

आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून 14 दिवसानंतर आजीची कोरोना चाचणी घेण्यात आली. दोन टेस्टमध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यापूर्वी मिरजेतील कोरोनाच्या रुग्णालयातून दोन वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावर यशस्वी उपचार करुन त्यालाही कोरोनामुक्त करण्यात आले आहे.

दुसरीकडे, मुंबईतील 93 वर्षीय महिलेनेही कोरोनावर मात केली. माझगावची रहिवासी असलेल्या आजीबाईना 17 एप्रिलला सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी या महिलेला हायपरटेन्शन आणि अशक्तपणासारख्या व्याधीही होत्या.

 

(Sangli 94 Years Old Lady Corona Free)