AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...

शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे…

| Updated on: Sep 13, 2026 | 9:16 AM
Share

आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. श्वेता महाले यांच्या "बाप तो बाप रहेगा" गाण्यावरील नृत्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे हे प्रकरण तापले आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात बुलढाणा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्या आणि हावभावांबाबत तक्रार दाखल केली होती. गेल्या 1 सप्टेंबर रोजी आमदार श्वेता महाले बुलढाण्यात बाप तो बाप रहेगा या गाण्यावर थिरकल्या होत्या. यावर प्रश्न विचारला असता, आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, “बाप तो बाप रहेगा हे माणसानं बोललेलं बरं पण एखाद्या बाईनं म्हटलं की बाप आहे तर बाई बापासारखं शरीर कुठून आणणार.” हे वक्तव्य आणि त्यानंतर केलेले हावभाव यामुळे महिलांच्या मनाला लज्जा वाटली, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Published on: Sep 13, 2026 09:16 AM

Follow Us