विशाल पाटील यांच्यावरच्या कारवाईच्या मागणीवर संजय राऊतांचं भाष्य; म्हणाले, कारवाई जाणूनबुजून…

Sanjay Raut on Vishal Patil and Sangali Loksabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

विशाल पाटील यांच्यावरच्या कारवाईच्या मागणीवर संजय राऊतांचं भाष्य; म्हणाले, कारवाई जाणूनबुजून...
sanjay raut
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 5:37 PM

सांगली महाविकास आघाडीत उमेदवारीवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, म्हणून आग्रही असणारे विशाल पाटील नाराज झाले. विशाल पाटील सध्या अपक्ष निवडणूक लढत आहेत. विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. यावर शिवेसना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशाल पाटील यांना कोण काय पाठिंबा द्यावा हा आमचा प्रश्न नाही. विशाल पाटील कारवाई जाणूनबुजून कारवाई होत नाही, मला तसं वाटत नाही. त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असं संजय राऊत म्हणालेत.

चंद्रहार पाटील हे सांगलीतलं कुस्तीमधील सगळ्यात मोठं नाव आहे. ज्याने प्रतिष्ठा उंचावली. तो नवखा म्हणत असतील तर ते राजकारणातील नवखे आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.

नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

दिवा विझतांना फडफडतो… त्यांना आमच्यावर आरोप करू देत, टीका करू देत. या निवडणुकांत ते विजयी होणार नाहीत. झोपेत सुध्दा ते आमच्यावर टीका करतात. आमचे सरकार बनणार आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असं म्हणत राऊतांनी मोदींना प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा भाजपला काही फायदा होत नाही. नक्कीच भाजप धास्तावलेली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. त्यांचे आस्तित्व राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंवर निशाणा

एकनाथ शिंदे म्हणजे अटल बिहारी वाजपेयी का? की दिनदयाळ आहेत का? फडणवीस काय बोलतात? फडणवीसांना मोदी शहांनी मुख्यमंत्री पदाच्या लायक समजले नाही. याची त्यांना खंत आणि दु:ख पाहिजे. मुख्यमंत्री होते आणि नंतर ते पण उपमुख्यमंत्री दुसरे झाले. फडणवीसांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्त आहेत. त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने झिडकारलं आहे. काही काळ मुख्यमंत्री होते. म्हणून महाराष्ट्राला माहित झाले बाकी त्यांचे काय फार मोठं कर्तृत्व नाही, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.