काश्मीरचे IAS टॉपर शाह फैजल यांचा राजीनामा

श्रीनगर: यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2010 च्या बॅचचे टॉपर शाह फैजल यांनी राजीनामा दिला आहे. IAS टॉपर शाह फैजल यांच्या राजीनाम्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जम्मू काश्मीरमधील तणावाच्या परिस्थितीतून शाह यांनी प्रशासकीय सेवा सोडण्याचा निर्णय घेतला.  शाह फैजल हे सरकारी सेवा सोडून राजकारणात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत […]

काश्मीरचे IAS टॉपर शाह फैजल यांचा राजीनामा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

श्रीनगर: यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2010 च्या बॅचचे टॉपर शाह फैजल यांनी राजीनामा दिला आहे. IAS टॉपर शाह फैजल यांच्या राजीनाम्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जम्मू काश्मीरमधील तणावाच्या परिस्थितीतून शाह यांनी प्रशासकीय सेवा सोडण्याचा निर्णय घेतला.  शाह फैजल हे सरकारी सेवा सोडून राजकारणात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत शाह फैजल हे, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

शाह फैसल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.

काश्मीरमध्ये होणाऱ्या हत्या आणि इथल्या परिस्थितीकडे केंद्र सरकारने केलेला कानाडोळा याविरोधात मी IAS अर्थात प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत आहे. काश्मीरी जनजीवन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देईन, असं शाह फैजल यांनी म्हटलं आहे.

शाह फैजल यांची नॅशनल कॉन्फरन्सशी चर्चा सुरु असून, लवकरच ते या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शाह हे 2010 मधील यूपीएससीचे टॉपर होते. त्यांनी यापूर्वी सातत्याने जम्मू काश्मीरमधील तणावाबाबत जाहीर भाष्य केलं आहे.  शाह फैजल यांनी बुधवारीच आपला राजीनामा पाठवला. मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही.

दरम्यान, शाह फैजल यांच्या राजीनाम्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन, त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. ‘नोकरशाहीचं नुकसान, राजकारणाचा फायदा’ असं अब्दुल्लांनी ट्विटमध्ये म्हटलं. दुसऱ्या एका ट्विटमध्ये अब्दुल्ला म्हणतात, “आम्ही त्यांचं (शाह फैजल) राजकारणात स्वागत करतो. त्यांच्या राजकीय भविष्याबाबत लवकरच घोषणा केली जाईल”  अब्दुल्लांच्या या ट्विटमुळे शाह फैजल हे त्यांचा पक्ष म्हणजे नॅशनल कॉन्फरन्समध्येच प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

2010 मधील यूपीएससी टॉपर असलेल्या फैजल शाह यांना होम केडेर अर्थात जम्मू काश्मीर मिळालं होतं. इथे त्यांनी जिल्हा मॅजिस्ट्रेट, शालेय शिक्षण संचालक आणि ऊर्जा विकास प्राधिकरण संचालक म्हणून काम पाहिलं. नुकतंच ते हॉर्वर्ड केनेडी स्कूलमधून फेलोशिप घेऊन अमेरिकेहून परतले होते.

कोण आहेत शाह फैजल? 17 मे 1983 रोजी जन्मलेले शाह फैजल मूळचे जम्मू-काश्मीरमधील आहे. फैजल सध्या 35 वर्षांचे आहेत. 2010 मध्ये शाह फैजल यांनी भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, काश्मीरमधील पहिले IAS टॉपर बनले. देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही जाहीरपणे शाह फैजल यांचे कौतुक केले होते. त्यावेळी सर्वच स्तरातून शाह फैजल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. 9 जानेवारी 2019 रोजी म्हणजे आज शाह फैजल यांनी भारतीय प्रशासन सेवेला राम राम ठोकत, राजकारणात प्रवेश करण्याच निर्णय घेतला आहे. आयएएस टॉपर असलेल्या शाह फैजल हे काश्मिरातील तरुणांचा हिरो बनले होते आणि आजही त्याच्याकडे ‘आदर्श’ म्हणून पाहिले जाते.

शाह फैजल यांची फेसबुक पोस्ट

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.