Maharashtra Political News live : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार

| Updated on: May 06, 2024 | 8:14 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 5 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार

लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील ११ मतदार संघात प्रचार सभा, रॅली मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभा आहेत. शरद पवार तीन तर अजित पवार पाच सभा घेणार आहेत. शरद पवार गटाच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांनी वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 May 2024 01:59 PM (IST)

    इंदापूरमध्ये महाविकास आघाडीची सभा

    इंदापूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे . माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील पोहोचले आहेत. शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणी लोक जमायला सुरुवात झाली.  मैदान आताच जवळपास भरलं. थोड्या वेळात शरद पवार येतील. राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार सभेच्या ठिकाणी दाखल झालेत.

  • 05 May 2024 01:45 PM (IST)

    विश्वजीत कदम काय म्हणाले?

    आदित्य ठाकरे वेळात वेळ काढून प्रचारासाठी येत असतील. तर चंद्रहार पाटील, शिवसेनेची ताकत तुमच्यापाठीशी असल्याचा संदेश आहे. गेल्या काही महिन्यात जे काही घडले. उद्धव ठाकरेंच्या सभेत मी माझ्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला, विश्वजित कदम म्हणाले. ते विट्यात बोलत होते.

  • 05 May 2024 01:30 PM (IST)

    चंद्रहार पाटील यांच्यासाठी मविआची सभा

    सांगली लोकसभा निवडणुकीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची विटा इथं सभा होत आहे.  या प्रचार सभेसाठी आदित्य ठाकरे विट्यात दाखल झाले आहेत. त्याच्या सोबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पोहोचलेत.

  • 05 May 2024 01:15 PM (IST)

    प्रणिती शिंदे यांच्या विरोधात नाव न घेता बॅनरबाजी

    निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात नाव न घेता बॅनरबाजी करण्यात आली आहे.  अपक्ष उमेदवार सचिन म्हस्के यांनी प्रणिती शिंदे यांच्या बॅनर शेजारी विरोधी बॅनर लावलं आहे. सोलापुरातील विविध चौकात लावण्यात बॅनर आले.  "वडिलांनी मागच्या 40 वर्षात सोलापूरसाठी कांहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार..?"अशा आशयाचे बॅनर्स झळकले आहेत. प्रणिती शिंदे यांच्या बॅनरशेजारीच बॅनर लागले आहेत.  या बॅनरबाजीची शहरात जोरदार चर्चा होतेय.

  • 05 May 2024 12:51 PM (IST)

    पंकजा मुंडे यांनी केले मोठे भाष्य

    जातीसाठी माती नका खाऊ, मातीसाठी जाती व्यवस्था संपुष्टात आणा. मी मत विकासाठी मागत आहे. तरुणाईचे भविष्य बदलण्यासाठी मी मत मागत आहे. मी पाकिस्तान , बांगलादेश म्हणून आले का मी बीडचीच आहे ना, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

  • 05 May 2024 12:42 PM (IST)

    लोकशाहीमध्ये दादागिरी करून काहीही उपयोग नाही- पंकजा मुंडे

    हात जोडून पाया पडून मतदान मागण्याची आणखीन वेळ आली नाही. नम्रपणे मतदान लोकशाहीमध्ये मतदान मागितले पाहिजे. अरेरावी करून फायदा होत नाही. लोकशाहीमध्ये दादागिरी करून काहीही उपयोग नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

  • 05 May 2024 12:19 PM (IST)

    अर्चना पाटील यांनी केले मोठे विधान

    गेल्या 10 वर्षात मोदी यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे, अनेक योजना राबविल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधायला दिले, महिलांचा त्रास कमी झाला. कोरोना काळात नेतृत्व सिद्ध केले, मोफत लस दिली, सगळ्यांना धान्य दिले, असे अर्चना पाटील यांनी म्हटले.

  • 05 May 2024 12:02 PM (IST)

    अमोल कोल्हे यांचे अत्यंत मोठे विधान

    माझी निवडणूक बाकी असताना मी हिकडे येतोय त्याला दोन कारण.. तुमच्या खासदार बोलायला लागतात तेंव्हा पंतप्रधानपासून सर्व जण टक लावून ऐकत असतात.. मी मला भाग्यवान समजतो मला संधी मिळाली, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.

  • 05 May 2024 11:50 AM (IST)

    दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नीरज बवाना टोळीचा साथीदार सद्दाम उर्फ गौरी याला अटक

    दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नीरज बवाना टोळीचा साथीदार सद्दाम उर्फ गौरी याला अवैध शस्त्रांसह अटक केली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिली.

  • 05 May 2024 11:40 AM (IST)

    दहावी, बारावीचा निकाल याच महिन्यात

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे. त्याबाबतचे संकेत राज्य मंडळानेच दिले आहेत. बारावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता आहे.

  • 05 May 2024 11:30 AM (IST)

    सोलापूर- तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा प्रचाराचा आज शेवटचा दिवस, प्रणिती शिंदे यांची पदयात्रा

    सोलापूर- तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पदयात्रा काढली आहे.  शहरातील कन्ना चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत ही पदयात्रा चालणार आहे. या पदयात्रेत सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार दिलीप माने, महेश कोठे हे नेते सहभागी झाले आहेत.

  • 05 May 2024 11:20 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या आदेशानंतर महायुतीच्या सर्व प्रचार रैलीमध्ये मनसैनिकांचा सहभाग

    राज ठाकरे यांच्या आदेशानंतर महायुतीच्या सर्व प्रचार रैलीमध्ये मनसैनिकांचा सहभाग झाला आहे. मनसैनिकांनी आज माय मच्छीमार कॉलनीमध्ये राहुल शेवाळे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आपली ताकद दाखवली. हजारोंच्या संख्येने आज मनसैनिक रॅलीमध्ये सहभागी झाले. अडीच लाखांच्या फरकाने राहुल शेवाळे यांना मनसेच्या मतांचा फायदा होईल अशी भावना यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केली.

  • 05 May 2024 11:10 AM (IST)

    समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता

    शनिवारी सकाळपासून ते आज रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणं टाळावं, असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केलं आहे.

  • 05 May 2024 11:00 AM (IST)

    देशात वातावरण बदलत आहे

    देश में माहोल बदल रहा हे.पक्ष गेला चिन्ह गेल काही हरकत नाही मी खंबीर आहे. मला कितीही संघर्ष करावा लागला तरी मी खंबीर पणे उभी राहिली आहे तुमच्या ताकतीवर, असे सुप्रिया सुळे भोरच्या सभेत म्हणाल्या.

  • 05 May 2024 10:50 AM (IST)

    निवडणुकीत अलर्ट राहून काम

    निवडणुकीत अलर्ट राहून काम करावे लागते असे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.आमच्या पदयात्रेत कॉम्रेड आडम मास्तर, दिलीप माने, महेश कोठे अनेक नेते सहभागी झाले.आजच्या पदयात्रेचा जसा प्रतिसाद आहे तसाच प्रतिसाद उद्याच्या निवडणुकीत असेल.सत्तेतले पाच आमदार समोर आहेत आणि प्रणिती एकटी आहे.उद्याच्या पार्लमेंट मध्ये ती देशाला काय दिशा दाखवून देईल त्याचे हे उदाहरण आहे.

  • 05 May 2024 10:40 AM (IST)

    विजय शिवतारे यांची टीका

    संसदेत फक्त भाषणं केलीत मात्र कामं काय केलीत ते सांगा,15 वर्षात एक नवीन प्रकल्प मतदारसंघात आणला नाही, अशी टीका विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंवर केली आहे. वडिलांच्या परिस्थितीचे इनकॅश करण्याचा सुळेंकडून केला जातोय, असा आरोप पण त्यांनी केला.

  • 05 May 2024 10:30 AM (IST)

    शिक्षण संस्थांमधील रॅगिंगला चाप

    विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी ने शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या रॅगिंग विरोधात कडक पाऊल उचलले आहे. मागील वर्षी महाविद्यालयांमध्ये घडलेल्या 1 हजारहून अधिक रॅगिंग प्रकरणापैकी जवळपास 90 टक्के प्रकरणही निकाली काढले आहेत तर या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच यूजीसीने नियमाचे अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांना कारवाईचा इशारा दिला आहे.

  • 05 May 2024 10:20 AM (IST)

    जादूटोण्याच्या संशयावरुन वृद्धाचा छळ

    गडचिरोली जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाला चटके देणारी दुसरी घटना एटापल्ली तालुक्यात समोर आली. एटापल्ली तालुक्यातील जांबिया या गावात ही घटना घडली. समाज मंदिराच्या मंडवात या वृद्धेला सुईचे चटके देण्यात आले.घटना 29 एप्रिलला घडली. दोन दिवसानंतर यात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

  • 05 May 2024 10:10 AM (IST)

    उदय सामंत यांची ठाकरेंवर टीका

    मुख्यमंत्र्यांची नाळ लोकांशी जुळलेली आहे, काहींचा संबंध नव्हता त्यांनी फेसबुक लाईव्ह करत उपदेश करणे आणि टोमणे मारणे हेच काम केलं, अशी टीका उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

  • 05 May 2024 10:00 AM (IST)

    कचरा डेपोला आग, धुराचे लोट

    सोलापूर महापालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागली असून गेल्या दोन दिवसांपासून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. धुरामुळे नजीकच्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या कचरा डेपोला आग लागल्याने महामार्गावर धुराचे लोट पसरत आहेत.

  • 05 May 2024 09:50 AM (IST)

    Live Update | समृध्दी महामार्गावर अपघात, 3 मे ल सकाळी घडली घटना

    अपघातात छत्तीसगढ मधील तीन जणांचा मृत्यू , तर दोन जन जखमी.. गाडीला दिली मागून अज्ञात वाहनाने धडक... धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार... अज्ञात गाडी चालक विरोधात गुन्हा दखल... घटना झाल्यावर महामार्ग पोलिसांनी जखमींना उपचारासाठी हलविले

  • 05 May 2024 09:40 AM (IST)

    Live Update | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कोल्हापूर जिल्ह्यात बाईक रॅली

    कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहरात बाईक रॅली... मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह महायुतीचे दोन्ही उमेदवार बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार... कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर मुक्कामी... आज संध्याकाळी पाच वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपणार

  • 05 May 2024 09:24 AM (IST)

    Live Update | अजित पवारांची भोरमध्ये जाहीर सभा

    सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा... भोरच्या शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार सभा... सभेच्या ठिकाणी वाटण्यात आले सुनेत्रा पवार यांचे प्रचार साहित्य... घड्याळ चिन्ह असणारे पॉम्प्लेट ,घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे आले वाटण्यात

  • 05 May 2024 09:13 AM (IST)

    Live Update | खडकवासला मतदारसंघातील भोर मध्ये अजित पवारांची सांगता सभा

    सुनेत्रा पवार यांचे प्रचारार्थ भोरमध्ये अजित पवार घेणार प्रचार सभा... भोर शहरातील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीची जाहीर सभा... बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस... आज दिवसभरात अजित पवारांच्या पाच प्रचारसभा... भोर, वेल्हा, वरवंड, इंदापूर आणि बारामतीत अजित पवारांच्या प्रचार सभा...

  • 05 May 2024 08:57 AM (IST)

    रत्नागिरीत ३० हजार लोकांना पाणी टंचाईच्या झळा

    रत्नागिरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्यांनी शतक पार केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या १०९ वर पोहचली आहे. ३० हजार लोकांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.

  • 05 May 2024 08:45 AM (IST)

    काँग्रेस नेते आबा बागुल रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात

    काँग्रेस नेते आबा बागुल रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय होणार आहे. धंगेकरांच्या प्रचारार्थ आबा बागुलांकडून सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 5 वाजता सहकारनगरमध्ये सभा होत आहे. काँग्रेसकडून आबा बागुलांची नाराजी दूर करून प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे.

  • 05 May 2024 08:27 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

    पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 14 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सात धरणे दहा टक्क्यांच्या खाली आली आहे. धरणांमधील पाणी साठ्याने अक्षरशः तळ गाठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे.

  • 05 May 2024 08:19 AM (IST)

    खतांच्या किंमती वाढल्या

    आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. शिवाय बेसल डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासूनच मागणी होत आहे. अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली.

Published On - May 05,2024 8:15 AM

Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.