AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 5 May 2024 : सोन्याचा दर किंचित वधारला तर चांदी नरमली, ग्राहकांना खरेदीची संधी

Gold Silver Rate Today 5 May 2024 : मे महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. आठवड्याच्या अखेरीस सोने किंचित वधारले तर चांदीने नरमाईचा सूर आळवला. या आठवड्यात मौल्यवान धातूंनी उसळी न घेतल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण आला नाही.

Gold Silver Rate Today 5 May 2024 : सोन्याचा दर किंचित वधारला तर चांदी नरमली, ग्राहकांना खरेदीची संधी
सोने वधारले, चांदी जैसे थे
| Updated on: May 05, 2024 | 8:33 AM
Share

मे महिन्यातील पाच दिवसांत सोने आणि चांदीने मोठ उलटफेर केला नाही. ग्राहकांना मोठा दिलासा दिला. भावात चढउतार झाला. मार्च आणि एप्रिल महिन्यासारखा या महिन्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूंनी कोणताही विक्रम नावावर नोंदवला नाही. यापूर्वी दोन्ही महिन्यांच्या सुरुवातीला बेशकिंमती धातूच्या किंमती सूसाट होत्या. त्यांनी मोठी चढाई केली. एप्रिलच्या मध्यापर्यंत सोने आणि चांदीने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. या आठवड्यात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली नाही. काय आहेत सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 5 May 2024 )

किंचित वधारले सोने

आठवड्याच्या सुरुवातीला 29 एप्रिलला सोने 300 रुपयांनी घसरले. दुसऱ्या दिवशी किंमती जैसे थे होत्या.1 मे रोजी सोने 1,000 रुपयांनी दणकावून आपटले. 2 मे रोजी सोन्याचा भाव 700 रुपयांनी चढला. 3 मे रोजी 500 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 4 मे रोजी सोने 100 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी जैसे थे

17 एप्रिलपासून चांदीने मोठी कामगिरी बजावलेली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला 29 एप्रिल रोजी मोठा बदल झाला नाही. 30 एप्रिलला चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 1 मे रोजी किंमती जैसे थे होत्या. 2 मे रोजी चांदीत 500 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर भाव जैसे थेच आहेत.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. असोसिएशनने अजून किंमती अपडेट केलेल्या नव्हत्या. 24 कॅरेट सोने 71,191 रुपये, 23 कॅरेट 70,906 रुपये, 22 कॅरेट सोने 65,211 रुपये झाले. 18 कॅरेट 53,393 रुपये, 14 कॅरेट सोने 41,647 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,989 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष