ठाण्याचे पालकमंत्री दाखवा, एक हजार मिळवा, एकनाथ शिंदेंवर शहापूरच्या शेतकऱ्यांचा संताप

| Updated on: Oct 19, 2020 | 11:45 AM

शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत जात असल्याचे चित्र आहे. एकही आमदार, खासदार मंत्री शेतकऱ्याच्या शेतावर फिरकून ही पाहत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. Shahapur taluka farmers angry on Eknath Shinde for not visiting rain affected farms

ठाण्याचे पालकमंत्री दाखवा, एक हजार मिळवा, एकनाथ शिंदेंवर शहापूरच्या शेतकऱ्यांचा संताप
Follow us on

शहापूर : पश्चिम महाराष्ट्र, मराठावाडा, विदर्भ, खानदेश, या भागात आमदार, खासदार, मंत्री यांचे रोज पाहणी दौरे चालू आहेत. ठाणे जिल्ह्यातही पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली जात नसल्याने शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, असा संताप व्यक्त केला आहे. (Shahapur taluka farmers angry on Eknath Shinde for not visiting rain affected farms)

लोकसभा -विधानसभेच्या वेळी मत मागण्यासाठी शहापूर तालुक्यात फेऱ्या मारणाऱ्या राजकीय नेत्यांनी संकटाच्या काळात शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. एकही आमदार, खासदार मंत्री शेतकऱ्याच्या शेतावर फिरकून ही पाहत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसाने नेहरोली, लेनाड, जांभे, शिरगाव, नडगाव, शेंदरून, आल्याणी या भागात भातशेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. भात खाली पडून पाण्यात कुजून गेले आहे तर खाली पडलेल्या भाताला नवीन कोंब फुटले आहेत.

कोरोनाच्या महासंकटातही शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली. अवकाळी पावसाने व करप्या या रोगाने भातशेतीची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. पेरलेले 50 किलो बियाणं सुध्दा मिळणार नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून वेळीच शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी शेतकरी मागणी करत आहेत.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण मध्ये 100 % भात लागवड केली जाते शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे, त्यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे.

संबंधित बातम्या:

गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा, एकनाथ शिंदेंकडून जवानांचं कौतुक

Eknath Shinde | एकनाथ शिंदे कोरोनामुक्त, खासदार मुलासोबत रुग्णालयातून घरी

(Shahapur taluka farmers angry on Eknath Shinde for not visiting rain affected farms)