देशद्रोहींनो, शेम ऑन यू! ‘द टेलिग्राफ’ची सोशल मीडियावर तुफान चर्चा

मुंबई: पुलवामा हल्ल्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसेशनवरुन त्यांच्यावर विरोधीपक्ष तुफान टीका करत आहेत. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर होते. या दिवशी त्यांनी जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट दिली आणि फोटोसेशनही केलं. या फोटोसेशनचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. […]

देशद्रोहींनो, शेम ऑन यू! 'द टेलिग्राफ'ची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई: पुलवामा हल्ल्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसेशनवरुन त्यांच्यावर विरोधीपक्ष तुफान टीका करत आहेत. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर होते. या दिवशी त्यांनी जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट दिली आणि फोटोसेशनही केलं. या फोटोसेशनचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले.

हाच मुद्दा पकडून काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदींवर तुफान हल्ला केला. इतरांना राष्ट्रप्रेम शिकवणारे मोदी आणि भाजप पुलवामासारख्या भीषण हल्ल्यावेळी फोटोसेशन करत होते, यावरुन त्यांची संवेदनशीलता दिसते, असा हल्लाबोल काँग्रसने केला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला आम्ही सर्व उपस्थित होतो, मात्र स्वत: पंतप्रधान मोदी प्रचारसभांमध्ये व्यस्त होते, असं पवार म्हणाले.

या सर्व पार्श्वभूमीवर द टेलिग्राफ या इंग्रजी दैनिकाने पंतप्रधान मोदींच्या नऊ दिवसातील छटा टिपल्या आहेत. त्या आजच्या दैनिकात छापल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या या नऊ छटा आहेत. विविध ठिकाणी सभा, बैठकांदरम्यान मोदींची मुद्रा टेलिग्राफने छापली. या सर्व मुद्रा आनंदी, उत्साही आहेत. टेलिग्राफच्या या फोटो अल्बमची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

टेलिग्राफाने या फोटोंना दिलेलं कॅप्शन खूपच टोले लगावणारं आहे.

“देशद्रोहींनो तुम्हाला लाज वाटायला हवी! (शेम ऑन यू अँटी नॅशनल्स). तुम्ही 14 फेब्रुवारीपासून पंतप्रधानांच्या दु:खावर प्रश्नचिन्ह कसं काय उपस्थित करु शकता? तेव्हापासून (पुलवामा हल्ल्यापासून) ते केवळ काळे कपडे परिधान करत आहेत”

हा प्रश्न विचारुन टेलिग्राफने पंतप्रधान मोदींचे फोटो छापले. मोदींनी 14 फेब्रुवारीनंतर काय काय केलं, त्याचे हे फोटो आहेत.

मोदींनी 15 फेब्रुवारीला वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला, मग 16 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. 14 ते 22 फेब्रुवारीपर्यंत मोदींनी काय काय केलं हे फोटोद्वारे टेलिग्राफने छापलं आहे.

या फोटोंवरुन टेलिग्राफने मोदींवर तुफान टीका केल्याचं पाहायला मिळतं.

संबंधित बातमी

… तेव्हा मोदी जिम कॉर्बेट नॅशनल पार्कात फोटोसेशन करत होते

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.