शरद पवार यांनी काय बोलावे हे तुम्ही नका सांगू… राज्यातील बडा नेता कडाडला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी मोठी टीका केली. अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. यासोबतच पक्ष बांधणीबद्दल त्यांनी भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी नुकताच मोठी टीका केली. शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, पक्षामध्ये फेरबदल करण्याची सुरुवात झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळे पदाधिकारी बदललेले आहेत. प्रवक्त्यांच्या बाबतीत सुद्धा चांगले कार्यकर्ते नवीन आलेले आहेत. या सर्वांच्या बाबतीत चर्चा करायची आहे. कार्यकर्ते पदाधिकारी असतील लिमिटेड करायचं ठरवलेले आहे. सध्या मीडियामध्ये आमचा प्रवक्ता सक्षमपणे भूमिका मांडली असं करायचं आहे. 15 तारखेला आणि 24 तारखेला पक्षाचं नेतृत्व एकत्र बसणार आहे. प्रवृत्तांच्या बाबतीमध्ये चर्चा होईल आणि नवीन आणि जुने प्रवक्त्यांबद्दल चर्चा केली जाईल. शिवराळ भाषा ही प्रत्येक पक्षाची अजेंडा झालेला दिसत आहे. आमच्या पक्षाचे धोरण अशी आहेत भान ठेवून प्रतिक्रिया द्यावी.
शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रातील नवीन यादी अनेक नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करायची आहे. जुने नवीन कार्यकर्त्यांची बॉडी तयार करणार आहोत. गुंगी गुडियाच्या वादावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, पक्षाची भूमिका एखाद्या बहिणीवर अचानक आलेली जबाबदारी मिळताना स्वीकारताना थोडा वेळ लागतो. त्या चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे.
सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला तर बाकीच्यांना संधी मिळणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड हे प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे जबाबदार आहे. नेत्यांनी निर्णय घेतले पाहिजे. हे जर केले तर कोणाला टीका करायला जागा राहणार नाही. संजय काकडे यांनी काय स्टेटमेंट करावे, हा तो त्यांचा विषय आहे पण शरद पवार त्यांना किती मदत केली आहे हे माहिती आहे.
शरद पवार यांना उपदेश द्यायचे कारण नाही. आता या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये आणि तशी भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केला आहे. संजय काकडे यांनी शरद पवारांकडे अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे पहावं. पवारांनी काय बोलावं आणि नाही हे संजय काकडे यांनी आव्हान करू नये.
नीट पेपर फुटला तेव्हा लगेच कारवाई करायची पण अजित पवार यांच्या बाबतीत अध्यापही कोणी बोलत नाही. अहवाल अजून आला नाही. त्यांच्या पक्षातील प्रमुखांनी आवाज उठवला तर सत्य लवकर बाहेर येईल. कोणाला मंत्री मंडळात घ्यायचे नाही घ्यायचे ते मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे.
अमोल मिटकरी यांनी जर शरद पवारांची भेट घेतली असेल तर आनंदच आहे. आल्यानंतर त्यावरती चर्चा केलेली बरी. शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. प्रमुख व्यक्ती बसलेला असतो, तेव्हा आपल्या नेत्याची उंची आणि पद लक्षात घेतले पाहिजे. हे दोन वेळा घडले. कोणत्याच महिला भगिणीबाबत आदर राखणे महत्वाचे