AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harshvardhan Sapkal on Gungi Gudiya Row : तर त्यांनी दुर्गा आहे हे सिद्ध करावं.. गुंगी गुडिया टीकेवर हर्षवर्धन सपकाळ ठाम

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' म्हटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या टीकेचे समर्थन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, उपमुख्यमंत्री पवार विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर (अजित पवारांचा अपघात, अर्थखातं) मौन बाळगत असल्याने हे वर्णन योग्य असल्याचे म्हटले. आम्ही त्यांना गुंगी गुडिया म्हटलं,. त्यांनी आपण दुर्गा आहोत हे साबित करावं, असं आव्हान सपकाळ यांनी दिल.

Harshvardhan Sapkal on Gungi Gudiya Row : तर त्यांनी दुर्गा आहे हे सिद्ध करावं.. गुंगी गुडिया टीकेवर हर्षवर्धन सपकाळ ठाम
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ ?
| Updated on: Aug 04, 2026 | 3:39 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उद्देशून काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ असा शब्द वापरल्याने राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या शब्दामुळे मोठी खळबळ माजली असून  विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येतत्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही यावरून काँग्रेसला फटकारत, पुढल्या वेळेस बोलताना आधी स्वत:कडे लक्ष द्या,  अशी टीका केली होती. तर रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेतून त्यांची बाजू मांडत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ आम्ही त्यांना गुंगी गुडिया म्हटलं असेल, तर त्यांनी आपण दुर्गा आहे हे सिद्ध करावं…  ते सिद्ध करण्याकरता,  अजित दादांच्या अपघाताचा शोध लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही  हे त्यांनी सांगावं, त्यांनी ताबडतोब अर्थखातं स्वत:च्या पक्षाकडे घ्यावं. लाडक्या बहिणींचं अनुदान जे 1500 वरून वाढवण्यात येणार होतं, त्यांनी ते ताबडतोब 2100 रुपये करावं,  ‘ असं म्हणत सपकाळ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाने केलेलं वर्णन योग्य – हर्षवर्धन सकपाळ

ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने काँग्रेसने ट्विट केलं, त्या पीसीमध्ये पत्रकार प्रश्न विचारत होते. पण एक लोकप्रतिनिधी ऐवजी गुंड म्हणून ज्यांचं व्यक्तीमत्व पुढे आलं, अशा प्रवृत्तीची ओळख असणारा, अशी अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे, त्याने पत्रकारांना एकेरीत बोलून चुप्प बसवलं. आणि अशा वेळेस उपमुख्यमंत्री ( सुनेत्रा पवार) एक शब्दही बोलल्या नाहीत. उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नसेल, आणि आमदाराकरवी जर त्या पत्रकारांना चूप बसवत असतील तर हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी, तोंडावर बोट ठेवणं, चुप बसणं अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतल्याने, ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी करण्यात आला, ते वर्णन योग्य आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी ठामपणे सांगितलं.

हा मुकेपणा अशोभनीय

गुंगी गुडिया ही शिवी आहे का, तो अपशब्द आहे का, तो काही असंसदीय शब्द आहे का ? तर नाही, ते एक वर्णन आहे. हा शब्द उपमुख्यमंत्र्यांवर अतिशय व्यवस्थितपणे बसला आहे. त्या अनेक विषयावर बोलत नाहीत. अजित दादा पवार यांचा अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही,  त्यावर त्या बोलत नाहीत. या अपघातप्रकरणी गुन्हा अद्याप दाखल का झालेला नाही, त्यावरही त्या बोलत नाहीत.  यासोबतच, अर्थखातं त्यांना अद्याप का मिळालं नाही, त्यावरही त्यांचं मौन आहे.  त्यांच्या अधिकारावर आणि त्यांच्या पक्षावर भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात गदा आणत आहे, त्यावरही त्या ( सुनेत्रा पवार) काही बोलत नाहीत.  असं एकंदरीत , त्यांनी जे बोलणं थांबवलं आहे, जो मुकेपणा आणलेला आहे. सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीला हा मुकेपणा अशोभनीय आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस मोदी-शहांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे

मात्र आता स्थिती अशी आहे की त्या गुंगी गुडिया तर आहेतच आहेत, पण भारतीय जनता पक्षाकडून, रोज त्यांच्या ( राष्ट्रवादी काँग्रेस) पक्षाचे, त्यांच्या आमदारांचे, त्यांच्या खात्यातल्या मंत्र्यांचे, त्यांचे जे हाल होत आहेत.  मुख्यमंत्री त्यांच्या विभागाकडे विशेष लक्ष देत नाहीत, त्यामुळे आता  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष  हा मोदी- अमित शहांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे का , अशी संशयाची स्थिती झाली आहे, अशी घणाघाती टीकाही सपकाळ यांनी केली.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप