पवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची चार तोळ्यांची चेन चोरीला

| Updated on: Oct 18, 2020 | 5:06 PM

शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पवारांच्या या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांची गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेली.

पवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट, शिवसेना आमदाराची चार तोळ्यांची चेन चोरीला
Follow us on

उस्मानाबाद : अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाला आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पवारांच्या या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ही चेन लंपास केली. आमदारांचीच चैन लंपास झाल्याने सर्वत्र एकच धांदल उडाली. (Shivsena MLA Dnyanraj Chaugule Chain stealing In Sharad pawar usmanabad Tour)

आज तुळजापूरमधून शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात शरद पवार यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी अधिकारी देखील आहेत. उमरगा तालुक्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले देखील पवारांसोबत आहेत. चौगुले यांच्या गळ्यात 4 तोळे वजनाची चेन होती. या चेनीची किंमत जवळपास 2 लाख रुपये होती. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आमदार चौगुलेंच्या गळ्यातील चेन लंपास केली.

चेन चोरीला गेल्यानंतर आमदार चौगुले यांनी याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नाहीये. मात्र झाल्या प्रकाराने यंत्रणेची चांगलीच धापवळ उडाली. खुद्द आमदार साहेबांचीच चेन लंपास झाल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत.

शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना शरद पवारांनी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान मोठं आहे. या संकटावर एकत्रितरित्या मात करायला हवी. आपण भूकंपासारख्या संकटाला तोंड दिलं आहे, त्यामुळं धीर धरा, अशा शब्दात पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

शरद पवारांची बळीराजाशी ‘मन की बात’

शरद पवार यांनी आज तुळजापूरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली.

तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली.

(Shivsena MLA Dnyanraj Chaugule Chain stealing In Sharad pawar usmanabad Tour)

संबंधित बातम्या

ऐशी वर्षांच्या योद्ध्याची बळीराजासाठी धडपड, शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याला मर्यादा, मदतनिधीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार