APMC मार्केटमध्ये कोरोनाचा कहर, आतापर्यंत एकूण 6 जणांना कोरोनाची लागण

| Updated on: Apr 28, 2020 | 2:59 PM

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित (Corona Patient Increase in APMC Market) करण्यात आला आहे.

APMC मार्केटमध्ये कोरोनाचा कहर, आतापर्यंत एकूण 6 जणांना कोरोनाची लागण
Follow us on

नवी मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित (Corona Patient Increase in APMC Market) करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊन दरम्यान अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केट सुरु आहेत. नवी मुंबईतीलही एपीएमसी भाजीपाला, फळ, मसाला आणि धान्य मार्केट सुरु आहे. मार्केट सुरु असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे येथेही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये काल (27 एप्रिल) एका भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (28 एप्रिल) एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली (Corona Patient Increase in APMC Market) आहे.

एपीएमसीतील धान्य बाजारातील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित होणारा एपीएमसीतीला हा सहावा व्यापारी आहे. हा व्यापारी धान्य मार्केटच्या G विंगमध्ये व्यापार करत होता. हा व्यापारी कोपरखैरानेमधील रहिवासी आहे. याआधी L विंगमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला, एका भाजीपाला व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटच्या सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई एपीएमसीमध्ये आता कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. दोन दिवसात मुंबई एपीएमसीमधील भाजीपला व्यापारी, फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी आणि धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानं बाजारात खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या माथाडी कामगार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एपीएमसीमध्ये कोरोनाचा गुणाकार सुरू झाल्याने नवी मुंबईकरांना डोकेदुखी वाढणार आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यापारी, दलाल, ग्राहक, माथाडी कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू झाले आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 145 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 4 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत राज्यात 8590 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 369 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 1282 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 वर, मुंबई एपीएमसीतील मार्केट ‘कोरोना हॉटस्पॉट’च्या वाटेवर?

Corona | APMC मध्ये भाजी-पाल्याची आवक, मात्र उठावच नाही, कोबी 2 रु., तर टोमॅटो 8 रु, किलो