प्रेमप्रकरणातून 25 वर्षीय फुटबॉलपटूची हत्या, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा

फुटबॉलपटू प्रदीप अलाटच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमप्रकरणातून 25 वर्षीय फुटबॉलपटूची हत्या, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलाविरोधात गुन्हा
Follow us
| Updated on: Dec 28, 2019 | 2:49 PM

सोलापूर : प्रेमप्रकरणातून सोलापुरात 25 वर्षीय फुटबॉलपटूची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना (Solapur Football Player Murder) उघडकीस आली आहे. बेदम मारहाण करुन प्रदीप विजय अलाट याचा जीव घेण्यात आला. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चेतन गायकवाड आणि तेजस गायकवाड फरार आहेत.

सोलापुरातील बेदम विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. फॉरेस्टमधील कुमार चौकात प्रदीप अलाट हा फुटबॉल प्रशिक्षक राहत होता.

प्रदीप शुक्रवारी सकाळी घराबाहेर गेला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तो घरी परत आला, मात्र लगेच घरातून निघून गेला. प्रदीप आपल्या प्रेयसीसोबत सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरायला गेला असताना आरोपींनी त्याला पाहिलं आणि फोन करुन बोलावून घेतलं.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रदीपने आपल्या मित्रांना फोन करुन काही जण आपल्याला मारहाण करत आहेत, त्यामुळे लवकर ये, असा निरोप दिला. मित्र पोहचण्याच्या आधीच आरोपींनी प्रदीपला रिक्षाने मोदी परिसरातील एका खासगी रुग्णालयात नेलं होतं. त्याला स्ट्रेचरवर टाकत, नातेवाईक येत आहेत, असं हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सांगून आरोपींनी पळ काढला.

हेही वाचा : कॉर्नर सीटवर पतीला गर्लफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडलं, पत्नी झाली ‘मर्दानी’

डॉक्टरांनी प्रदीपच्या खिशामधील मोबाईलने त्याच्या मित्रांना फोन करुन प्रदीपबद्दल माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी ही माहिती प्रदीपच्या कुटुंबीयांना दिली. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र आरोपींना पकडेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका प्रदीपच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

प्रदीपच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी चेतन गायकवाड आणि तेजस गायकवाड फरार आहेत.

प्रदीप अलाट हा राष्ट्रीय पातळीवरचा फुटबॉलपटू होता. तो कुमार चौक परिसरात आई आणि लहान भावासोबत राहत होता. सोलापुरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये फुटबॉलचं प्रशिक्षण देण्याचं काम (Solapur Football Player Murder) करत होता.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.