पाचगणीत पॅराग्लायडिंगदरम्यान कोरियन पर्यटकाचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

सातारा: पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकून एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. पाचगणी इथं ही धक्कादायक घटना घडली. सॅन टेक ओ  असं या 45 वर्षीय दुर्दैवी पर्यटकाचं नाव आहे. हा परदेशी नागरिक दक्षिण कोरियाचा होता. डोंगराला धडकल्यानंतर त्याला वाई येथील मिशन हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा कोरियन पर्यटक पाच दिवसापासून पाचगणी […]

पाचगणीत पॅराग्लायडिंगदरम्यान कोरियन पर्यटकाचा मृत्यू
Follow us on

सातारा: पॅराग्लायडिंग करताना डोंगराला धडकून एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला. पाचगणी इथं ही धक्कादायक घटना घडली. सॅन टेक ओ  असं या 45 वर्षीय दुर्दैवी पर्यटकाचं नाव आहे. हा परदेशी नागरिक दक्षिण कोरियाचा होता. डोंगराला धडकल्यानंतर त्याला वाई येथील मिशन हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा कोरियन पर्यटक पाच दिवसापासून पाचगणी इथं पर्यटनासाठी आला होता. मात्र मंगळवारी संध्याकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी पॅराग्लायडिंगचं आयोजन करणाऱ्या संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आयोजकांपैकी एकाला अटक करण्यात आली. अटकेतील आयोजक मुंबईचा आहे.

दरम्यान, सॅन टेक ओ हा मंगळवारी सहकाऱ्यांसोबत पॅराग्लायडिंग करत होता. त्यावेळी जवळपास 120 जण पॅराग्लायडिंगसाठी आले होते.  सॅन टेक ओ ने ही यावेळी हा थरार अनुभवला. मात्र उड्डानानंतर सॅन टेक ओ परतलाच नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. रात्री उशिरा जवळच्या गावाजवळ टेकडीवर त्याचा मृतदेहच सापडला.

पॅराग्लायडिंगदरम्यान सॅनचं पॅराशूट सोसाट्याचे वाऱ्याने झाडावर आदळलं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.