अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, 40 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा अधिक जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शनिवारी रात्री उशिरा आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा अधिक लोक जखणी झाले आहेत.

अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ला, 40 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा अधिक जखमी
| Edited By: | Updated on: Aug 18, 2019 | 7:55 AM

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शनिवारी रात्री उशिरा आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या धक्कादायक हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हा हल्ला दुबईतील एका लग्न समारंभात झाला. या समारंभात 1 हजार पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. या हल्ल्यामधील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा हल्ला कुणी केला याचा तपास सध्या तेथील पोलीस करत आहेत.

28 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानमध्ये निवडणुका होत आहेत. या मुद्द्यावरुन अमेरिका आणि तालिबान यांच्यातील वाद वाढला आहे. त्यामुळे हा हल्ला झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. अपगाणिस्तानमध्ये झालेला हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. यापूर्वी 10 दिवसाआधी अफगाणिस्तानमध्ये बॉम्ब स्पोट करण्याता आला होता. यामध्ये 95 जण जखमी झाले होते. हा बॉम्ब स्पोट एका कारमध्ये करण्यात आला होता.