पती उत्तर प्रदेशचा तर पत्नी बंगालची, तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

| Updated on: Nov 20, 2020 | 12:26 AM

वसईच्या भोयदापाडा येथील तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचा सोबतच संशायास्पदरीत्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या दाम्पत्यापैकी पती उत्तर प्रदेश तर पत्नी पश्चिम बंगालची असल्याचे सांगण्यात येत आहे.

पती उत्तर प्रदेशचा तर पत्नी बंगालची, तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू
Follow us on

पालघर : वसईच्या भोयदापाडा येथे तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचा सोबतच संशायास्पदरीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या दाम्पत्यापैकी पती उत्तर प्रदेश तर पत्नी पश्चिम बंगालची असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांच्याही पोटात अचानक दुखायला लागल्याने शेजारच्यांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दोघांनीही जेवणात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (Suspicious death of a couple in vasai)

मिळालेल्या माहितीनुसार, वसई येथील भोयदापाडा परिसरातील बैठ्या चाळीत एका रुममध्ये विष्णू पटेल आणि प्रतिभा पटेल हे दाम्पत्य राहत होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडल्याने त्यांनी तीन वर्षांपूर्वी विवाह केला होता. पती विष्णू पटेल मुळचे उत्तर प्रदेश तर पत्नी प्रतिभा पटेल पश्चिम बंगल राज्यातील आहे. लग्नानंतर दोघेही भोयदाडा परिसरातील एका कारखान्यात काम करत होते.

मंगळवारी संध्याकाळी दोघांच्याही पोटात सोबतच दुखालयला लागले. दोघांनाही जुलाबचा त्रास व्हायला लागला. शेजारी राहणाऱ्यांना समजताच त्यांनी दोघांनाही वसईच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचाही बुधवारी उपचारादरम्यान रात्री उशिराने मृत्यू झाला.

दोघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोघांनाही सोबत पोटात दुखायला लागणे, दोघांनाही जुलाब, उलटीचा त्रास होणे, अशा लक्षणांमुळे त्यांच्या मृत्यूबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. दोघांच्याही मृत्यूबाबत प्रथम वसई पोलीस ठाण्याला कळवण्यात आले. त्यानंतर वालीव पोलीस ठाण्यात दोघांच्याही मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, वालीव पोलिसांकडून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मृत पती-पत्नीची उत्तरीय चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्या शरीरातील नमुने फूड अँड ड्रग्स विभागाला पाठवले असून, हा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले सांगितले. (Suspicious death of a couple in vasai)

संंबंधित बातम्या :

प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करुन स्वत:ला सुतळी बॉम्बने उडवून दिले; मुंबईतील धक्कादायक घटना, प्रियकर अटकेत

भाऊ-बहिणीचा अभ्यासाच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न, बहिणीचा मृत्यू

रिक्षाचालक संशयास्पदरीत्या फिरताना आढळला; चौकशी केली असता आढळले 56 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने