
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खानचा आज (20 डिसेंबर) वाढदिवस आहे. आज तैमुरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. तैमूरच्या वाढदिवसानिमित्ताने एक दिवसआधी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार आणि त्यांची मुलं आली होती.

वाढदिवसाच्या पार्टीत तैमूर एकदम खास लूकमध्ये दिसला. तैमूरने ब्लॅक टी-शर्ट, व्हाईट ट्राऊजर आणि त्यासोबत शूज घातले होते.

यावेळी करिना आणि सैफ एकदम साध्या लूकमध्ये दिसले.

करिना आणि सैफने फोटोग्राफर समोर पोझ दिल्या आणि केकही कापून वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसाच्या पार्टीत सैफची बहीण सोहा अली खानही आली होती. सोहासोबत तिची मुलगी इनायाही होती.

दिग्दर्शक करण जोहरही आपल्या मुलासोबत तैमूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजर होता.

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझाही आपल्या दोन्ही मुलांसोबत या पार्टीत उपस्थित होत्या.

तैमूरची मावशी करीश्मा कपूर, आई बबिता आणि मुलीसह पार्टीत पोहोचली होती.

तैमूरची मोठी बहीण अभिनेत्री सारा अली खानने आपल्या लाडक्या भावाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. साराने तैमूरसोबतच्या काही फोटोही शेअर केले.