Thackeray Film : सकाळपासूनच्या 10 घटना

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील प्रवासावर आधारित ‘ठाकरे’ (Thackeray) सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाबद्दल उत्साह आणि उत्सुकता सर्वांमध्ये दिसून येते आहे. सकाळपासूनच थिएटर हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. सकाळपासूून सिनेमाशी संबंधित 10 महत्त्वपूर्ण घटना काय घडल्या….   ठाकरे सिनेमाचं मुंबईतील वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये पहाटे 4.15 वाजता पहिला […]

Thackeray Film : सकाळपासूनच्या 10 घटना
Follow us on

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील प्रवासावर आधारित ‘ठाकरे’ (Thackeray) सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाबद्दल उत्साह आणि उत्सुकता सर्वांमध्ये दिसून येते आहे. सकाळपासूनच थिएटर हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. सकाळपासूून सिनेमाशी संबंधित 10 महत्त्वपूर्ण घटना काय घडल्या….

 

  1. ठाकरे सिनेमाचं मुंबईतील वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये पहाटे 4.15 वाजता पहिला शो सुरु झाला. हा ऐतिहासिक शो आहे. कारण साधरणत: इतर सिनेमांचे शो सकाळी सात वाजता सुरु होता.

 

  1. आयमॅक्स थिएटरमध्ये ठाकरे सिनेमाच्या पहिल्या शोला बाळासाहेबांची छबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवधर यांनी देखील हजेरी लावली.

 

  1. नागपुरात शो सुरु होण्याआधी फटाके फोडण्यात आले. रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी पूर्ण थिएटर बुक केलं आहे.

 

  1. मुंबईजवळील वसईत ढोलताशांच्या गजरात ठाकरे सिनेमाचा शो सुरु, पहिल्या शोसाठी खास ढोल ताशा पथक आणून सिनेमाच स्वागत, सिनेमागृहाच्या भोवताली संपूर्ण भगव्या झेंडे लावण्यात आलेत.

 

  1. पुण्यात ठाकरे सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी बाळासाहेबांची रांगोळी काढून शिवसैनिकांकडून मानवंदना

 

  1. ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमारने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय म्हणतो, “ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने माझा मित्र आदित्य ठाकरेला खूप साऱ्या शुभेच्छा. हा सिनेमा त्यांच्या आजोबांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि त्यांच्या महानतेबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. हेच रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहे”

 

  1. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेला ठाकरे चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला.नंदुरबार शहरातील नंदुरबार बिजनेस सेंटरमधील मिराज चित्रपटगृहात तुफान गर्दी आहे. आजच्या दिवसाचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. ठाकरेंच्या वेशभूषेत एक अवलिया चित्रपटगृहाबाहेर आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. बाळासाहेब ठाकरेंशी मिळता जुळता चेहरा हुबेहूब वेशभूषेत करतोय चित्रपटाचे प्रमोशन

 

  1. अभिनेत्र अमृता राव हिने ठाकरे सिनेमात माँसाहेबांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिने स्वत:च्या ट्विटर हँडलचे नाव बदलून ‘मीनाताई ठाकरे’ असे केले आहे.

 

  1. नवी मुंबईतील वाशीच्या आयनॉक्स थिएटरमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातला. ठाकरे सिनेमाचं पोस्टर थिएटरने लावलं नव्हतं. त्यावरुन शिवसैनिक संतापले.

 

  1. ठाकरे सिनेमा पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार, असे सिनेमाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.