मुलांमुळे सतत चिडचिड होतेय? सारखं त्यांच्यावर रागवता का? वाचा, ओव्हर पॅरेंटिंग कसं घातक ठरू शकतं? 

| Updated on: Jan 24, 2022 | 3:17 PM

Health Tips जग बदललं आहे, या जगात टिकायचं असेल तर प्रत्येक बाबतीत स्मार्ट असं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांना सतत मुलांचं टेन्शन असतं. वाढत्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलगा टॉपवर असला पाहिजे असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. त्यातून तुम्ही ओव्हर पॅरेंटिंगकडे जाता. आणि यातून मुलांचं नुकसान होतं.

मुलांमुळे सतत चिडचिड होतेय? सारखं त्यांच्यावर रागवता का? वाचा, ओव्हर पॅरेंटिंग कसं घातक ठरू शकतं? 
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

म्हणतात माणूस चुकीतून शिकतो. म्हणून म्हणतात चुका झाल्या पाहिजे त्यातून आपल्याला शिकायला मिळतं. पुढे जाऊ मग आपण परत ती चुक करत नाही. मात्र अनेक पालक हे विसरतात आणि मुलांना एका खास बंधनात वाढवितात. अनेक आई-वडिलांना वाटतं आपल्या मुलाकडून कुठलीही चूक व्हायला नको. तो सगळ्यात परफेक्ट बनावा मात्र पालक हेच विसरून जातात की परफेक्ट बनण्यासाठी पहिले काही चुका कराव्या लागतील. मात्र पालक त्यांना एका शिस्तीत वाढवितात. त्यांचा बाबतीत अधिक ओवर प्रोटेक्टिव होतात आणि याला ओवर पेरेंटिंग असं म्हणतात. या ओवर पेरेंटिंगचा मुलांवर काय परिणाम होतात पाहूयात.

काळानुसार पालकांनी बदल्याला हवं

हिंदी असो वा मराठी चित्रपट यातून अनेक वेळा पालक आणि मुलांवरील संबंध कसे असावे याबद्दल सांगण्यात आलं आहे. 2019 ला आलेला गर्ल्स चित्रपट यात पालक आणि मुलीचं नातं अधोरेखित केलं आहे. मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या नादात आईवडील चूक करुन बसतात. त्याचा परिणाम मुलांवर होतो. चिल्लर पार्टी या चित्रपटातही पालक आणि मुलांमधील संबंधाबद्दल दाखवण्यात आलं होतं. बदलत्या जेनरेशनसोबत पालकांनी बदलणं गरजेचं आहे.

ओवर पेरेंटिंगमध्ये पालक काय करतात?

1. मुलांचं आयुष्य आपल्या हिशोबाने कंट्रोल करणे
2. मुलांना अपघात, चुकीच्या एक्सपीरियंसपासून दूर ठेवणे
3. मुलांचे हार किंवा त्यांची कशात निवड न होणे हे त्यांना मान्य नसते
4. मुलं जे काम करतात ते पालकांच्या हिशोबानी झाली पाहिजे असा अट्टाहास धरणे
5. मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय पालक घेतात.
6. प्रत्येक वेळी आपल्या मुलांना ओवर प्रोटेक्टिव करणे.

ओवर पेरेंटिंगमुळे काय होतं?

• खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवणे – पालक मुलांकडून खूप जास्त प्रमाणात एक्सपेक्टेशन ठेवतात की त्यामुळे मुलांना कायम पराभवाची भीती वाटतं असते.
• करियरचा निर्णय पालक घेतात – असे पालक मुलांच्या अभ्यासाबद्दल त्यांचा करिअरबद्दल स्वत: निर्णय घेतात. त्यांना
• मुलांना मित्रमैत्रिणींसोबत जाण्यास बंदी – अनेक पालक मुलांना बाहेर जाण्यास किंवा मित्रमैत्रिणींसोबत जाणास मनाई करतात.
• मुलांना ऑर्डर देणे – अनेक आई-वडिल यांना मुलांवर कंट्रोल हवा असतो. त्यामुळे ते मुलांचं न ऐकता त्यांना फक्त ऑर्डर देत सुटतात.
• प्रत्येक गोष्टीत टोकणे – काही पालक तर मुलांना प्रत्येक गोष्टी अगदी उठता बसता टोकत असतात.
• इतरांनाही कंट्रोल करणे – असं पालक इतर लोकांना म्हणजे नातेवाईक, शेजारी, टीचर्स आदी लोकं सुद्धा ते म्हणतील तसेच त्यांचा मुलांसोबत व्यवहार करतील.
मुलांवर काय होतात परिणाम
1. ते जबाबदार बनत नाही
2. कुठलाही निर्णय त्यांना घेता येत नाही
3. नवीन काही शिकण्यास तयार नसतात
4. आत्मनिर्भर बनत नाही
5. सतत पराभवाची भीती वाटणे
6. घराबाहेर ते एकटे काही करु शकत नाही
7. आयुष्यात अनेक वेळी मुलांना अपयश येतं
8. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो
9. एका वेळेनंतर ते बंधनातून निघून काहीतरी चुकीचे निर्णय घेतात
10. पालकांविरोधात राग निर्माण होतो.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

इतर बातम्या-

यळकोट यळकोट जय मल्हार.. सातारा गावातलं मंदिर ते कडेपठार, दुमदुमला जयघोष, औरंगाबादेत खंडोबा यात्रेचा उत्साह!

Nashik | सटी सहा महिन्यांनी उगवलेल्या शिवसेना नगरसेवकाला नागरिकांनी पिटाळले; नेमके काय घडले?