चोराची शिरजोरी, नागपुरात पोलिसांच्याच ताब्यातील ट्रक लांबवला, सराईत चोर अखेर जेरबंद

| Updated on: Oct 22, 2020 | 12:12 AM

नागपुरात पोलिसांच्या अखत्यारीत असलेला ट्रक चोरुन चोरट्याने आपली बहादूरी दाखवली. मात्र, पोलिसांनी या चोराला पुन्हा ट्रकसोबत पकडलं.

चोराची शिरजोरी, नागपुरात पोलिसांच्याच ताब्यातील ट्रक लांबवला, सराईत चोर अखेर जेरबंद
Follow us on

नागपूर : नागपुरात पोलिसांच्या अखत्यारीत असलेला ट्रक चोरुन चोरट्याने आपली बहादूरी दाखवली (Thief Theft Truck). मात्र, कीरकीरी होताच पोलिसांनी पुन्हा ट्रॅकसह चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या घटनेने पोलिसांची चांगलीच नाचक्की झाल्याचं पाहायला मिळालं (Thief Theft Truck).

9 ऑक्टोबर रोजी सुमित पोद्दार या लोखंड व्यापाऱ्याचा 20 टन लोखंड लादलेला ट्रक लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुष्करणा भवन समोरुन चोरीला गेला होता. लाखोंचा मुद्देमाल भर रस्त्यातून चोरीला गेल्यामुळे पोलिसांनी चारही दिशेने पथक रवाना केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने 13 ऑक्टोबरला तो ट्रक मोर्शीवरुन जप्त करुन संजय ढोणे नावाच्या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर तो जप्त केलेला ट्रक आणि आरोपी संजय ढोणे याला गुन्हे शाखा पोलिसांनी लकडगंज पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला.

मात्र, लकडगंज पोलिसांनी ट्रक आणि मुद्देमाल मूळ मालकाला परत दिलाच नव्हता. पोलिसांनी तो ट्रक पोलीस ठाण्याच्या समोर उभा केला होता. या दरम्यान, आरोपी संजय ढोणे याला जामिनावर सोडण्यात आले, त्यावेळी हाच ट्रक पुन्हा चोरणार असल्याचे तो म्हणाला होता. मात्र, त्याच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी आरोपी संजय ढोणे याने बोललंल खरं करुन दाखवत चक्क पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रक चोरुन नेत पोलिसांना आव्हान दिलं. या घटनेनंतर पोलिसांची नाचक्की झाली. त्यामुळे पोलिसांसाठी ही घटनेना प्रतिष्ठेची ठरली (Thief Theft Truck).

पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी केली असताना आरोपी हा कळमेश्वर येथे चोरीचे लोखंड विकण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी थेट कळमेश्वर गाठून ट्रक जप्त केला. मात्र आरोपी आढळून आला नाही. पोलिसांनी त्याचा शोध काटोलमध्ये घेतला असता तो त्या ठिकाणी दारुच्या नशेत आढळून आला. लकडगंज पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चोर पोलिसांचा हा खेळ नागपुरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला. मात्र, पोलिसांना चॅलेंज करणारा पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Thief Theft Truck

संबंधित बातम्या :

घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले

मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक