मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक

बंगळुरुत एका 35 वर्षीय व्यक्तीने मटण विकणाऱ्याच्या दुकानातून चाकू चोरी करत एकाची हत्या केली.

मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक

बंगळुरु : बंगळुरुत एका 35 वर्षीय व्यक्तीने मटण विकणाऱ्याच्या दुकानातून (Bengaluru Man Stole Knife And Murder) चाकू चोरी करत एकाची हत्या केली. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव गणेश असून तो 35 वर्षांचा आहे. हत्या केल्यानंतर ही व्यक्ती जवळपास दोन तास आसपासच्या परिसरात फिरत होती. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती (Bengaluru Man Stole Knife And Murder).

पेट्रोलिंगवर असलेल्या टीमने गणेशला पकडून त्याच्याजवळील हत्यार जप्त केलं. गणेश रविवारी सकाळी साडे आठच्या जवळपास अंजनप्पा गार्डनमदील विनायक थिएटरजवळील मटणाच्या दुकानात पोहोचला. त्या दुकानातून त्याने एक चाकू चोरला. त्यानंतर तो रस्त्यावरील लोकांना धक्का देत चालू लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर

या व्यक्तीने ज्याची हत्या केली त्याचं नाव मारी आर आहे. तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

जखमींपैकी कोणीही हत्या करणाऱ्या व्यक्तीला ओळखत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी या माथेफिरुला अटक केली असून त्याची मानसिक स्थिती ठिक नाही. पोलीस सध्या त्याच्या आरोग्य अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.

या प्रकरणी गणेशवर हत्या आणि हत्या करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Bengaluru Man Stole Knife And Murder

संबंधित बातम्या :

मेळघाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, तात्काळ कारवाई करा, भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा

चोरलेल्या रिक्षातच गप्पांचा फड, डोंबिवलीत चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *