झाडाची पारंबी पडून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

झाडाची पारंबी पडून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सातारा: सहलीसाठी आलेल्या मुलाच्या डोक्यात वडाच्या झाडाची पारंबी पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रज्वल गायकवाड असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो  फलटण तालुक्यातील आलगुडेवाडी इथला रहिवासी होता.  प्रज्वलसह अनेक विद्यार्थी वडाच्या झाडाला लोंबकळून झोके घेत होते. त्यावेळी अचानक झाडाची पारंबी त्याच्या अंगावर कोसळली. यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला.  साताऱ्यातील जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे इथं ही धक्कादायक घटना घडली.

सहलीला गेलेल्या विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. शिक्षक आणि विद्यार्थी हादरुन गेलेत.

फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निंमकर बालभवन या शाळेची सहल आज सकाळी जावळी तालुक्यातल्या वडाचे म्हसवे इथे आली होती. त्यावेळी सहलीतील मुले वडाच्या झाडाच्या पारंब्यांशी खेळत होते. त्यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड वय 11 हा पाचवीतमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यात झाडाची पारंबी पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.  या अपघातामुळे मस्के गावात एकच खळबळ उडाली.
वडाच्या झाडाची पारंबी तुटून डोक्यात पडल्याने प्रज्वलला तातडीने कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI