आझम खान यांच्यावर किती गुन्हे? राज्यसेवेच्या मुलाखतीत प्रश्न

समाजवादी पक्षाचे खासदार आणि वादग्रस्त नेते आझम खान यांच्यावर किती खटले दाखल आहेत, असा प्रश्न (UPPSC civil services) या उमेदवाराला विचारण्यात आला.

आझम खान यांच्यावर किती गुन्हे? राज्यसेवेच्या मुलाखतीत प्रश्न

लखनौ : स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत अनेकदा अनपेक्षित प्रश्न विचारले जातात. उत्तर प्रदेश राज्यसेवा (UPPSC civil services) परीक्षा देणाऱ्या एका उमेदवारालाही असाच अनुभव आला. अमर उजालाच्या वृत्तानुसार, समाजवादी पक्षाचे खासदार आणि वादग्रस्त नेते आझम खान यांच्यावर किती खटले दाखल आहेत, असा प्रश्न (UPPSC civil services) या उमेदवाराला विचारण्यात आला. मुलाखतीनंतर बाहेर आल्यानंतर इतर उमेदवारांसोबत या उमेदवाराने त्याचा अनुभव शेअर केला.

सध्या उत्तर प्रदेश राज्यसेवा आयोगाच्या मुलाखती सुरु आहेत. 2029 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलंय. मुलाखतीत उमेदवाराची अभ्यासाच्या पलिकडची समज आणि वैयक्तिक चाचणी करण्यासाठी अनेक अनपेक्षित प्रश्नही विचारण्यात आले. मुलाखतीसाठी अगोदरच सरकारी नोकरी करत असलेल्या उमेदवारांचाही समावेश असल्याने वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत.

उमेदवार बाहेर आल्यानंतर त्यांचा अनुभव एकमेकांशी शेअर करतात. यामध्ये आणखी एक प्रश्न म्हणजे, बाबरी मशीद वाद कुणाकुणामध्ये सुरु आहे? करतारपूर कॉरिडॉरचं शिख समुदायासाठी महत्त्व काय? पाकिस्तानकडून कोणत्या धोरणाचा वापर केला जाऊ शकतो? बीआरआय काय आहे? मॉब लिंचिंग म्हणजे काय? मिशन शक्तीबाबत सांगा, कुलभूषण जाधव प्रकरण काय आहे? असे आंतरराष्ट्रीय संबंधी प्रश्नही विचारण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI