नागपूरकरांना आता घरबसल्या तक्रार करता येणार, तुकाराम मुंढेंकडून नागपूर लाईव्ह अॅप लाँच

| Updated on: Apr 08, 2020 | 6:49 PM

नागपूर महापालिकेतर्फे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नागपूर लाईव्ह सिटी अॅप लाँच करण्यात आले (Nagpur live city app) आहे.

नागपूरकरांना आता घरबसल्या तक्रार करता येणार, तुकाराम मुंढेंकडून नागपूर लाईव्ह अॅप लाँच
Follow us on

नागपूर : नागपूर महापालिकेतर्फे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ लाँच करण्यात आले (Nagpur live city app) आहे. आजपासून हे अॅप नागरिकांच्या सेवेत येणार आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून हे अॅप तयार करण्यात आले (Nagpur live city app) आहे.

नागपूर लाईव्ह सिटी अॅपच्या माध्यमातून कोणत्याही नागरी सुविधांची तक्रार घरबसल्या दाखल करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी सुविधांमधील समस्या आणि तक्रारींसाठी आता मनपाच्या कोणत्याही कार्यालयात चकरा मारण्याची गरज पडणार नाही.

“नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या या अॅपचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा”, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नागपूरमध्ये काल (7 एप्रिल) पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे. तसेच कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी या मार्गदर्शक तत्त्वांचं कठोर पालन करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात एक हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात चार हजाराच्यावर कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे.