टीव्ही 9 ग्रुपचं आणखी एक चॅनल, लवकरच ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ भेटीला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई: विविध भाषांमध्ये ठसा उमटवल्यानंतर टीव्ही 9 ग्रुप आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. लवकरच ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ हे हिंदी चॅनल लाँच करण्यात येत आहे. येत्या मार्च महिन्यात हे चॅनल प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होईल. सध्या टीव्ही 9 ग्रुपचे टीव्ही 9 मराठी, तेलुगु, कन्नड, गुजराती, टीव्ही 1 हैदराबाद, न्यूज 9 बंगळुरु अशी विविध भाषांमधील न्यूज चॅनल्स […]

टीव्ही 9 ग्रुपचं आणखी एक चॅनल, लवकरच ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ भेटीला
Follow us on

मुंबई: विविध भाषांमध्ये ठसा उमटवल्यानंतर टीव्ही 9 ग्रुप आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. लवकरच ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ हे हिंदी चॅनल लाँच करण्यात येत आहे. येत्या मार्च महिन्यात हे चॅनल प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होईल. सध्या टीव्ही 9 ग्रुपचे टीव्ही 9 मराठी, तेलुगु, कन्नड, गुजराती, टीव्ही 1 हैदराबाद, न्यूज 9 बंगळुरु अशी विविध भाषांमधील न्यूज चॅनल्स आहेत. त्यामध्ये आता ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीची अर्थात नॅशनल न्यूज चॅनल्सची भर पडणार आहे.

कोणी हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध भडकवत आहे, कोणी समाजात द्वेष पसरवत आहे तर कोणी खोटं पसरवत आहे. सर्व बाजूंनी द्वेष आणि द्वेष पसरत आहे. या सर्व गदारोळात जे दाखवलं जात नाही, तेच सामान्य भारतीयांचं प्रतिक भारतवर्षमधून दाखवण्यात येणार आहे.

आओ देश बदलें अशी टॅगलाईन ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ची आहे.

देश आणि जनतेशी संबंधित मुद्द्यांवर नजर ठेवून असलेल्या बड्या चेहऱ्यांच्या टीमसह ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ सॅटेलाईट टीव्ही दुनियेत पाऊल ठेवेल.

‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या हिंदी न्यूज चॅनेलसाठी देशातील सर्वात मोठा न्यूज स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये AR आणि VR या नव्या तंत्रज्ञानासह, प्रस्तुतीकरण आणखी उत्तम करण्यासाठी ‘बीओटी न्यूज रॅकर’ (BOT News Tracker) चा वापर करण्यात येणार आहे.

‘टीव्ही 9 भारतवर्ष’ हे फ्री टू एअर चॅनल असेल. त्यामुळे हे चॅनल सर्वत्र मोफत पाहता येईल. याशिवाय चॅनल जगभरात केबल, डीटीएचसह डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

टीव्ही 9 ग्रुप हा देशाच्या विविध भागात 6 न्यूज चॅनलच्या माध्यमातून कार्यरत आहे. प्रादेशिक क्षेत्र गाजवल्यानंतर आता टीव्ही 9 ग्रुप ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर हुकूमत गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

मानवतेची मूल्ये आणि हित लक्षात घेऊन ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ काम करेल. अन्य हिंदी न्यूज चॅनेल्सविरुद्ध ‘टीव्ही 9 भारतवर्ष’वर ज्योतिष कार्यक्रम प्रसारित केले जाणार नाहीत.

असोसिएटेड ब्रॉडकास्टिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (ABCL) ची सुरुवात 2003 मध्ये टीव्ही 9 ग्रुपचे CEO रवीप्रकाश यांनी केली. तेव्हापासून टीव्ही 9 ग्रुप प्रादेशिक भाषांमध्ये अग्रेसर आहे. आता नवा विक्रम स्थापित करण्यासाठी टीव्ही 9 भारतवर्ष ही नवी वाहिनी सज्ज झाली आहे.

टीव्ही 9 भारतवर्ष’ ट्विटरवर फॉलो कराhttps://twitter.com/TV9Bharatvarsh

टीव्ही 9 भारतवर्ष ला फेसबुकवर लाईक करhttps://www.facebook.com/TV9Bharatvarsh