मानाच्या ENBA पुरस्करांमध्ये टीव्ही 9 मराठीची बाजी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली : टीव्ही 9 मराठीने मानाच्या ENBA पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. ऑपरेशन बाजार आणि मिशन 400 ला बेस्ट प्रोग्राम म्हणून गौरवण्यात आलंय. चालू घडामोडी विभागातील पुरस्कार टीव्ही 9 मराठीला प्रदान करण्यात आला. टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक रोहित विश्वकर्मा यांच्यासह टीमने हा पुरस्कार स्वीकारला. ऑपरेशन बाजारमध्ये टीव्ही 9 मराठीने राज्यभरातील शेतकऱ्यांची कैफीयत मांडली होती. […]

मानाच्या ENBA पुरस्करांमध्ये टीव्ही 9 मराठीची बाजी
Follow us on

नवी दिल्ली : टीव्ही 9 मराठीने मानाच्या ENBA पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. ऑपरेशन बाजार आणि मिशन 400 ला बेस्ट प्रोग्राम म्हणून गौरवण्यात आलंय. चालू घडामोडी विभागातील पुरस्कार टीव्ही 9 मराठीला प्रदान करण्यात आला. टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक रोहित विश्वकर्मा यांच्यासह टीमने हा पुरस्कार स्वीकारला.

ऑपरेशन बाजारमध्ये टीव्ही 9 मराठीने राज्यभरातील शेतकऱ्यांची कैफीयत मांडली होती. बाजार समित्यांमध्ये शैतकऱ्यांना मिळणारा हमीभाव व्यापारी स्वतःच कसा हडप करतात, याची परिस्थिती टीव्ही 9 मराठीने स्टिंग ऑपरेशनने समोर आणली होती.

मिशन 400 लाही बेस्ट प्रोग्राम म्हणून पुरस्कार देण्यात आला. वसई-विरारमध्ये मिठागरामध्ये महापूर आला होता. यावेळी शेकडो लोक अडकले होते. टीव्ही 9 मराठीने यावेळी फक्त वार्तांकनच केलं नाही, तर अडकलेल्या लोकांपर्यंत अन्नही पुरवलं होतं. प्रतिनिधी राहुल झोरी यांनी सहा किमी पाण्यात जाऊन वार्तांकन केलं होतं.