सूर्यकिरण क्रॅश, बंगळुरुत हवाई कसरतीदरम्यान दोन विमानांची धडक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

बंगळुरु: कर्नाटकातील बंगळुरुमध्ये हवाईदलाच्या दोन विमानांची हवेतच टक्कर होऊन भीषण अपघात झाला. हवाई शो दरम्यान दोन सूर्यकिरण (Surya Kiran) या विमानांची हवेत धडक झाली. या अपघातात दोन्ही पायलट बाहेर झेपावल्याने ते सुरक्षित आहेत. बंगळुरुतील येलाहंका हवाईतळावर ही दुर्घटना घडली. विमानांनी उड्डाणं केल्यानंतर क्षणार्धातच ही धडक झाली. हवाईदलाचा एअर शो उद्या अर्थात 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. […]

सूर्यकिरण क्रॅश, बंगळुरुत हवाई कसरतीदरम्यान दोन विमानांची धडक
Follow us on

बंगळुरु: कर्नाटकातील बंगळुरुमध्ये हवाईदलाच्या दोन विमानांची हवेतच टक्कर होऊन भीषण अपघात झाला. हवाई शो दरम्यान दोन सूर्यकिरण (Surya Kiran) या विमानांची हवेत धडक झाली. या अपघातात दोन्ही पायलट बाहेर झेपावल्याने ते सुरक्षित आहेत. बंगळुरुतील येलाहंका हवाईतळावर ही दुर्घटना घडली. विमानांनी उड्डाणं केल्यानंतर क्षणार्धातच ही धडक झाली. हवाईदलाचा एअर शो उद्या अर्थात 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मात्र त्याआधीच सरावादरम्यान दुर्घटना घडल्याने उद्याच्या शोवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हवाई शोदरम्यान विमानांच्या चित्तथरारक कसरती आपण टीव्हीवर पाहात असतो. मात्र अशाच कसरती करत असताना आज ही दुर्घटना घडली.

बंगळुरुमध्ये हवाई दलाचा एअर शो सुरु आहे. या शोच्या निमित्ताने सूर्यकिरण या विमानांचा सराव सुरु होता. त्यावेळी दोन्ही विमानं हवेत झेपावली. मात्र काही क्षणातच दोन्ही विमानांची धडक झाल्याने दुर्घटना घडली. दोन्ही विमानांची हवेतच टक्कर होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. विमानांची टक्कर झाल्यानंतर विमानांच्या पायलट्सनी बाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे सुदैवाने दोघेही बचावले आहेत.

VIDEO:

अपघाताचे फोटो