VIDEO : जम्मूतील तावी नदीत चार जण अडकले, बचावकार्यादरम्यान वायुदलाची दोरी तुटून दोघे पाण्यात पडले

| Updated on: Aug 19, 2019 | 3:38 PM

जम्मूतील तावी नदीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढतानाच वायुदलाचा (Airforce) एक थरारक व्हिडीओ (Tawi River Rescue Operation) समोर आला आहे.

VIDEO : जम्मूतील तावी नदीत चार जण अडकले, बचावकार्यादरम्यान वायुदलाची दोरी तुटून दोघे पाण्यात पडले
Follow us on

श्रीनगर (जम्मू) : हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मूमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पुरात अनेकजण अडकले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, वायुदलाने बचावकार्य सुरु आहे. जम्मूतील तावी नदीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढतानाच वायुदलाचा (Airforce) एक थरारक व्हिडीओ (Tawi River Rescue Operation) समोर आला आहे. मात्र हे बचावकार्य सुरु असताना अचानक दोर तुटल्याचीही घटनाही घडली आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

जम्मूच्या तावी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने एका सिमेंटच्या बंधाऱ्यावर चार जण अडकले होते. या चौघांना वाचवण्यासाठी वायुदलाने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. यातील दोन जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यासाठी लावलेली वायुदलाची दोरी तुटली. त्यांना पोहता येत असल्याने ते दोघेजण पोहत नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले.

यानंतर वायूदलाने सिमेंटच्या बंधाऱ्यावर अडकलेल्या दोघांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरु करण्यात आले. यावेळी पुन्हा अशाप्रकारे घटना घडू नये म्हणून सुरुवातीला एका जवानाला दोरखंडाच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आले.

त्यानंतर त्या जवानाने त्या दोघांना जॅकेट घातले आणि नंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना रेस्क्यू केले. त्या दरम्यान बचावकार्यासाठी आलेला वायुदलाचा जवान त्या ठिकाणी बसून राहिला. त्यानंतर वायुदलाचे जवानाला वाचवण्यात आले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे केरळमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 121 वर पोहोचली आहे. तर हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिमलामध्ये 2 जण बेपत्ता आहेत.