US election 2020 : हँड सॅनिटायझरमुळे अमेरिकेच्या निवडणुकीत बॅलेट स्कॅनर झालं जाम, तासभर मतदान रखडलं

| Updated on: Nov 04, 2020 | 9:43 PM

या निवडणुकांसाठीची मतमोजणी जवळपास अर्धी पूर्ण झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आणि रिपब्लिन पक्षाचे उमेवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. यामध्ये जो बायडन सध्या आघाडीवर आहे.

US election 2020 : हँड सॅनिटायझरमुळे अमेरिकेच्या निवडणुकीत बॅलेट स्कॅनर झालं जाम, तासभर मतदान रखडलं
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या 46 व्या अध्यक्षपदाच्या (US Election 2020) निवडणुकांवर सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. या निवडणुकांसाठीची मतमोजणी जवळपास अर्धी पूर्ण झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आणि रिपब्लिन पक्षाचे उमेवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. यामध्ये जो बायडन सध्या आघाडीवर आहे. द टेलीग्राफने दिलेल्या माहितीनुसार, 538 ‘इलेक्टोरल कॉलेज सीट’ जागांपैकी बायडन यांना 238 आणि ट्रम्प यांना 213 मते मिळाली आहेत. तर निवडणूक जिंकण्यासाठी 270 मतदार मतांची आवश्यकता आहे. (US election 2020 hand sanitizer jams ballot scanner in us)

यासगळ्यात, एक विचित्र घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या आयोवा राज्यातील बॅलेट स्कॅनरनं काम करणंच बंद झालं. याचं कारणही तसंच वेळगं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदारांनी वापरलेल्या हँड सॅनिटायझरच्या आर्द्रतेमुळे स्कॅनरमध्ये बिघाड झाला. न्यूयॉर्क डेली न्यूजच्या वृत्तानुसार, मशीन आयोवामधील डेस मोइन्स इथे सुमारे एक तासासाठी बंद ठेवण्यात आलं होतं.

अखेर मशीन बंद पडल्यानंतर हाताने सॅनिटायझरं डिस्पेंसर बाजूला करण्यात आलं जेणेकरून सॅनिटायझर वाळून जाईल आणि मतपत्रिकेला चिकटणार नाही. मतपत्रिकेमध्ये ओलावा तयार झाल्यामुळे मशीन जाम झाली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे.

कोरोनाच्या धोक्यामध्ये अमेरिका सध्या प्रथम क्रमांकावर आहे. मार्चपासून आयोवामध्ये कोरोना विषाणूची सुमारे 135,000 प्रकरणं झाली आहेत. यामुळे इथे सॅनिटाझर आणि मास्कच्या वापरावर कठोर नियम आहेत.

दरम्यान, अमेरिकेत अजूनही मतमोजणी सुरु आहे. बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. जो बायडन सध्या आघाडीवर आहेत. जो बायडन यांना 238 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. तर, डोनाल्ड ट्रम्प 213 वोट्स मिळवून 25 वोट्सने पिछाडीवर आहेत.

इतर बातम्या – 

चप्पूवरून प्रवास करताना तिघांचा मृत्यू, त्याच चप्पूवरुन प्रवास करून आमदार धस यांचा कुटुंबाला धीर

उल्लासनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकचालकाने 5 ते 6 दुचाकींना उडवलं; पाहा CCTV व्हीडिओ

(US election 2020 hand sanitizer jams ballot scanner in us)